आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून दु:खद बातमी समोर आली आहे. दक्षिणेतील प्रसिद्ध आर्ट दिग्दर्शक सुनील बाबू यांचे निधन झाले आहे. वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. रिपोर्ट्सनुसार, तीन दिवस आधी त्यांच्या पायाला सूज आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. चित्रपट निर्मात्या अंजली मेनन यांनी सुनील बाबू यांच्या निधनाची माहिती दिली आहे. अभिनेता दुलकर सलमानने सोशल मीडियावर सुनिल बाबू यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सुनील बाबू यांनी मल्याळम, तेलुगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये आर्ट दिग्दर्शक आणि प्रोडक्शन डिझायनर म्हणून काम केले आहे. त्यांनी साबू सीरिलमधून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मनोरंजसृष्टीत एंट्री केली होती. सुनील बाबू यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
सुनील यांनी दाक्षिणात्य चित्रपटांसह हिंदीतही काम केले आहे. 'सिंग इज किंग', 'एमएस धोनी', 'पा', 'लक्ष्य', 'स्पेशल 26' सारख्या चित्रपटांसाठी त्यांनी आर्ट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. त्याशिवाय त्यांनी 'रोज' या हॉलिवूड चित्रपटासाठीही आर्ट दिग्दर्शक म्हणून काम केले. 'अनंतभद्रम', 'बँगलोर डेज', 'उरुमी', 'प्रेमम', 'नोटबुक', 'कायमकुलम कोचुन्नी' आणि 'छोटा मुंबई' हे त्यांचे प्रसिद्ध चित्रपट आहेत. त्यांना 'अनंतभद्रम' चित्रपटासाठी बेस्ट आर्ट डायरेक्टर म्हणून केरळ स्टेट फिल्म अवॉर्डही मिळाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.