आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठवणी:सुनील-नर्गिस यांच्या लग्नामुळे नाराज झाले होते मेहबूब खान, नर्गिस यांच्यासाठी मारली होती सुनील यांनी आगीत उडी

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • 1964 मध्ये ‘मुझे जीने दो’ चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार.
 • 1968 मध्ये पद्मश्रीने सन्मान.
 • 1995 मध्ये फिल्मफेअरचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला.
 • 1997 मध्ये स्टार स्क्रीनचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला.
 • 2005 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला.

बॉलिवूडमध्ये खूप अभिनेते होऊन गेलेत, परंतु आपल्या नायिकेला वाचवण्यासाठी काेणीही आगीत उडी मारली नाही. जो उत्कृष्ट अभिनेता होता, खरा प्रियकर होता, चांगला पितादेखील होता. तो राजकारणी झाला आणि गरिबांचा आधार बनला. प्रत्येकाला मनापासून आवडणारा मित्रांचा मित्र होता... ‘मदर इंडिया'चा ‘बिरजू'

सुनील दत्त यांचे खरे नाव बलराज रघुनाथ दत्त होते. पाकिस्तानातील झेलम जिल्ह्यातील खुर्द गावात त्यांचा जन्म झाला. फाळणीनंतर बलराज यांचे कुटुंब भारतात आले. फाळणीच्या वेळी कुटुंबाने सर्व गमावले होते आणि वडिलांचे लहानपणीच निधन झाले होते. भारतात एक निर्वासित म्हणून त्याचा जीवनाचा संघर्ष सुुरू झाला. 1950 मध्ये सुनील नोकरी आणि शिक्षणासाठी मुंबईला आले. यापूर्वी त्यांनी त्यांच्या बहिणीचे लग्न केले आणि छोट्या भावाला शाळेत प्रवेश मिळवून दिला. त्यांना 1951 मध्ये सिलोन रेडिओमध्ये सूत्रसंचालक म्हणून त्यांना काम मिळाले. सिलोन रेडिओ दक्षिण आशियातील सर्वांत जुने रेडिओ स्टेशन आहे. यात ते सिनेतारकांच्या मुलाखती घ्यायचे. त्यांना एका मुलाखतीचे 25 रुपये मिळायचे. यासोबत ते जयहिंद महाविद्यालयात शिक्षणही घेत होते. लेक्चर बुडवून ते मुलाखती घ्यायचे आणि बेस्ट बस डेपोमध्ये चेकिंग क्लार्कचे कामही करायचे.

 • रमेश सहगल यांनी दिले सुनील दत्त नाव

1955 मध्ये सुनील दत्त तृतीय वर्षात शिकत होते त्यावेळची ही गोष्ट आहे. एका रेडिओ शोमध्ये ते सेंट्रल स्टुडिओमध्ये दिलीप कुमार यांची मुलाखत घेत होते. तेथे रमेश सहगल यांनी त्यांना पाहिले. सहगल यांना सुनील दत्त यांना स्क्रीन टेस्ट देण्यास सांगितली. त्यांना दिलीप कुमार यांचे शर्ट अाणि ट्राउझर घालून त्यांची स्टिक घेऊन चालण्यास सांगितले, लाइटचा प्रकाश जसा त्यांच्या चेहऱ्यावर पडला तसे त्यांना उजव्या आणि डाव्या बाजूला वळायला सांगितले. नंतर सरळ पाहण्यास सांगितले. हे त्यांचे पहिले ऑडिशन होते. सहगल यांनी आपल्या सहकाऱ्याला सायनिंग अमाउंट देऊन सुनील यांना कॉलेज कँटीनमध्ये शोधण्यास पाठवले. सहगल यांनी सुनील यांना ‘रेल्वे प्लॅटफार्म’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी 150 रुपये अॅडव्हान्स दिले होते आणि बलराज नाव बदलून सुनील नाव ठेव, असेही सांगितले होते.

 • सुनील-नर्गिस यांच्या लग्नामुळे नाराज झाले होते मेहबूब खान

सुनील आणि नर्गिस यांनी कोणालाही न सांगता लग्न केले होते, परंतु याबाबत मेहबूब यांना माहीत झाले होते. ते त्यांच्या लग्नामुळे नाराज होते. या दोघांच्या लग्नामुळे त्यांच्या चित्रपटावर वाईट परिणाम होऊ शकतो असे त्यांना वाटत होते. नर्गिस यांच्या कुटुंबानेदेखील या लग्नाला विरोध केला होता. नर्गिस यांचे मोठे भाऊ अख्तर यांचा खूप विरोध होता. अख्तर यांना 1959 मध्ये संजय दत्तच्या जन्मानंतर आपली चूक समजली. नर्गिस यांना सर्व सुख सुविधा मिळाव्या म्हणून सुनील यांनी 58 पाली हिल येथे मोठा बंगला घेतला. सुनील यांना बंगला परवडत नव्हता. काही तडजोडीनंतर बंगल्याचे मालक मनू सुभेदार 1 सप्टेंबर 1957 ला त्यांना बंगला हप्त्याने देण्यास तयार झाले.

 • पहिल्या भेटीत नर्गिस यांच्याशी काहीच बाेलू शकले नाही सुनील

कॉलेजमध्ये असताना सुनील खूप लाजाळू होते. मुली त्यांच्याशी बोलण्याचा बहाणा शोधायच्या, परंतु ते त्यांच्यापासून लांब राहायचे. त्याचे म्हणणे होते, त्यांची देखील एक बहीण आहे, म्हणून ते काेणत्याही मुलीसोबत कधीच फ्लर्ट करणार नाही. त्या काळात नर्गिस या स्टार होत्या. त्या आपल्या गाडीत मरीन ड्राइव्हला जायच्या. मरीन ड्राइव्हच्या जवळ लागलेल्या रेलिंगमधून सुनील साहेब नर्गिस यांना पाहायचे, परंतु याबाबत नर्गिस यांना माहीत नव्हते. आणि सुनील मात्र त्यांच्या प्रेमात वेडे झाले हाेते. पहिल्यांदा नर्गिस एका मुलाखतीसंदर्भात सुनील यांच्याशी भेटल्या होत्या, परंतु त्यांना आपल्या  समोर पाहून सुनील खूप नर्व्हस झाले होते. त्यामुळे ते त्यांना काहीच प्रश्न विचारु शकले नव्हते. नंतर हा शो रद्द करावा लागला होता.

 • नर्गिस यांच्यासाठी सुनील यांनी मारली होती आगीत उडी

विमल रॉय यांच्या ‘दो बीघा जमीन’च्या सेटवर नर्गिस यांची सुनील दत्त यांच्याशी दुसऱ्यांदा भेट झाली. नर्गिस या बिमल रॉय यांना भेटायला गेल्या होत्या तर सुनील कामासाठी गेले होते. सुनील यांना पाहताक्षणी नर्गिसला मागची गोष्ट आठवली. त्यांना पाहून त्या हसत पुढे निघून गेल्या. यानंतर मेहबूब खान यांनी सुनील यांची ‘मदर इंडिया’ चित्रपटात नर्गिस यांच्या मुलाच्या भूमिकेसाठी निवड केली. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आणि पुन्हा सुनील चित्रीकरणादरम्यान नर्गिस यांच्यासमोर नव्हर्स होऊ लागले. त्यावेळी नर्गिस यांनी त्यांना शांत करत चित्रीकरण सुरू झाले. नर्गिसच्या या वर्तणुकीमुळे सुनील दत्त यांचा त्यांच्याकडे ओढा वाढला. चित्रपटाच्या सेटवर एक घटना घडली ज्यामुळे दोघेही एकत्र आले. गुजरात येथील बिलीमाेर गावात ‘मदर इंडिया’चे चित्रीकरण सुरू होते. चित्रपटाच्या एका दृश्यात शेतात आग लागते. परंतु या आगीत नर्गिस या खरंच अडकल्या होत्या आणि सुनील यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवले होते. खरंतर यादरम्यान सुनील देखील खूप भाजले होते. नर्गिस यांनी त्यांची रुग्णालयात खूूप काळजी घेतली होती. आगीच्या घटनेनंतर नर्गिस यांचा सुनील यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले होते.

 • सुनील यांच्यामुळे किशोर कुमार यांची स्टेजची भीती गेली

सुनील दत्त यांच्या जीवनाचा हा किस्सा आहे. त्यांनी भारताच्या सैनिकांचा उत्साह वाढवण्यासाठी एक कार्यक्रम ठेवला होता. हा कार्यक्रम बर्फाच्छादित पर्वतांवर करण्याचे निश्चित झाले. सुनील, किशोर कुमार यांना म्हणाले की, गुरू, तुम्ही तर चांगला अभिनय करता, गाणेदेखील अप्रतिम गाता. मंचावर सादरीकरण का करत नाही? मंचावर सादरीकरण म्हटले की किशोर कुमार यांना घाम यायचा. सुनील दत्त यांनी निश्चय केला की, किशोर कुमार यांच्याकडून स्टेजवर गाणे गाऊनच घेणार. शेवटी सुनील दत्त यांच्या सांगण्यावरून किशोर कुमार हे स्टेजवर गाण्यास तयार झाले. गंगटाेक जवळच सैनिकांच्या एका बटालियनमध्ये हा कार्यक्रम होणार होता. तेथील बर्फावर बसलेल्या जवानांना पाहून किशाेर म्हणाले, एवढ्या थंडीत कार्यक्रम कसा होणार तर सुनील म्हणाले, जवान आपलीच वाट पाहत आहेत. किशोर म्हणाले तुम्ही माइक पकडून पुढे उभे राहा मी मागे उभा राहून गातो. सुनील यासाठी तयार झाले. स्टेजवर किशोर यांनी डोळे बंद करून गाण्यास सुरुवात केली आणि सुनील तेथून बाजूला झाले. सैनिकांनी किशोर कुमार यांना पाहताच टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. टाळ्याचा आवाज ऐकून किशोर यांनी डोळे उघडले त्यांना सुनील दिसले नाही तर ते घाबरले, तरीदेखील टाळ्या वाजतच राहिल्या. सैनिकांचा जोश पाहून किशोरदांची भीती दूर झाली आणि त्यांनी सुनील यांचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...