आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमेडियन रुग्णालयात दाखल:सुनील ग्रोवरची झाली हार्ट सर्जरी, मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चाहते सुनीलच्या दीर्घायुष्यासाठी करत आहेत प्रार्थना

प्रसिद्ध विनोदवीर सुनील ग्रोवरला मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले आहे. येथे सुनीलवर हार्ट सर्जरी करण्यात आली आहे. आता त्याची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे. याला दुजोरा देताना रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, 'सुनील रुग्णालयात दाखल आहे. आता तो ठीक असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.'

चाहते सुनीलच्या दीर्घायुष्यासाठी करत आहेत प्रार्थना
रिपोर्ट्सनुसार, सुनीलच्या हृदयात ब्लॉकेज असल्याचे निदान झाले होते आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "शस्त्रक्रियेपूर्वी सुनील त्याच्या आगामी वेब सीरिजच्या चित्रीकरणात व्यस्त होता. तब्येत ठिक नसतानाही त्याने पुण्यात त्याच्या आगामी वेब सीरिजचे शूटिंग पूर्ण केले.' सुनीलच्या हार्ट सर्जरीची बातमी समोर येताच, त्याचे चाहते त्याच्या दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करत आहेत.
सुनील शेवटचा वेब सीरिज 'सनफ्लॉवर'मध्ये दिसला होता

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, सुनील शेवटचा Zee5 ची वेब सीरिज 'सनफ्लॉवर' मध्ये दिसला होता. या सीरिजमध्ये त्याच्यासोबत आशिष विद्यार्थी, रणवीर शौरी, गिरीश कुलकर्णी आणि मुकुल चढ्ढा होते. सुनील शाहरुख खानसोबत 'मैं हूं ना', आमिर खानसोबत 'गजनी', टायगर श्रॉफसोबत 'बागी', विशाल भारद्वाजच्या 'पटाखा' अशा अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे. पण 'द कपिल शर्मा शो'मधील गुत्थीच्या भूमिकेतून सुनीलला प्रसिद्धी मिळाली. मात्र, कपिल शर्मासोबत काही वाद झाल्याने सुनीलने हा शो सोडला होता. सध्या तरी सुनीलचा शोमध्ये परतण्याचा कोणताही विचार नाही.

बातम्या आणखी आहेत...