आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुनील म्हणतो नो मिन्स नो...:सलमानने समजूत घालूनही कपिल शर्मासोबत पुन्हा काम करण्यास तयार नाही सुनील ग्रोवर, वाचा नेमकं काय झालंय

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'द कपिल शर्मा शो'चा निर्माता आहे सलमान

विनोदवीर सुनील ग्रोवरने कपिल शर्मासोबत पुन्हा काम करण्यास नकार दिला आहे. 'द कपिल शर्मा शो'च्या आगामी सीझनमध्ये गुथ्थी म्हणजेच सुनील ग्रोव्हर पुन्हा एंट्री करणार असल्याची चर्चा होती. मात्र ताज्या वृत्तानुसार, सुनीलने या शोसाठी स्पष्ट नकार कळवला आहे.

2017 मध्ये कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यामध्ये झालेलं भांडण सर्वश्रुत आहे. एकेकाळी छोट्या पडद्यावरची ही सुपरहिट जोडी होती. मात्र काही वर्षापूर्वी त्यांच्यात वादाची ठिणगी उडाली होती. त्यानंतर सुनीलनं कपिल शर्मा शोही सोडला. या जोडीनं त्यांच्यातले वाद मिटवून पुन्हा एकत्र यावं अशी चाहत्यांसह बॉलिवूड अभिनेता सलमान खानची इच्छा आहे. या दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा सलमानने प्रयत्नदेखील केला आहे. मात्र सुनील कपिलसोबतच्या नात्यात पुन्हा वितुष्ट आणू इच्छित नाही. एकत्र काम केल्यास पुन्हा गोष्टी बिघडू शकतात, असे सुनीलचे मत आहे. त्यामुळे त्याने सलमानला शोसाठी आपला नकार कळवल्याचे वृत्त आहे.

'द कपिल शर्मा शो'चा निर्माता आहे सलमान
सलमान खान 'द कपिल शर्मा शो'चा निर्माता आहे. त्यामुळे कपिल आणि सुनील यांनी एकत्र यावं अशी त्याची इच्छा आहे. त्यामुळं या दोघांना पुन्हा एकत्र छोट्या पडद्यावर घेऊन येण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. कपिल शर्मा दुस-यांदा बाबा झाला आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवण्यासाठी त्याने काही दिवसांसाठी 'द कपिल शर्मा शो'मधून ब्रेक घेतला आहे. लवकरच या शोचा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...