आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनील ग्रोव्हरचा वाढदिवस:जसपाल भट्टी यांनी ओळखले होते सुनील ग्रोव्हरचे टॅलेंट, कुठेही परफॉर्म करण्यापूर्वी पत्नीला ऐकवतो जोक

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हरियाणातून मुंबईत पोहोचला सुनील

गुत्थी, रिंकू भाभी, डॉक्टर मशूहर गुलाटी या नावांनी ओळखला जाणारा प्रसिद्ध विनोदवीर सुनील ग्रोवर याचा आज 44 वा वाढदिवस आहे. 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' आणि 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमांमधून सुनील ग्रोव्हर प्रसिद्धीझोतात आला. आता कॉमेडी व्यतिरिक्त सुनील काही वेगळ्या भूमिकांमध्ये हात आजमावत आहे. एक नजर टाकुया, सुनील ग्रोव्हरच्या खासगी आयुष्यावर...

अशाप्रकारे हरियाणातून मुंबईत पोहोचला सुनील
सुनीलचा जन्म 3 ऑगस्ट 1977 रोजी हरियाणातील सिरसा जिल्ह्यातील डबवाली येथे झाला. येथेच त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो आपल्या कुटुंबासह चंदीगढमध्ये शिफ्ट झाला आणि येथूनच आपल्या करिअरला सुरुवात केली. येथील गुरु नानक कॉलेजमधून त्याने बी. कॉमची आणि त्यानंतर पंजाब युनिव्हर्सिटीतून मास्टर्स इन थिएटरमध्ये ही पदवी प्राप्त केली. सुनीलचे वडील जेएन ग्रोव्हर हे स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूर येथे मॅनेजर होते. ते आता निवृत्त झाले आाहेत.

शिक्षण पुर्ण झाल्यानंतर सुनील आपले नशीब आजमावण्यासाठी मुंबईत दाखल झाला. जसपाल भट्टी यांना आपला आदर्श मानणा-या सुनीलने सुरुवातीच्या काळात त्यांच्यासोबत चंदीगढ थिएटरमध्ये काम केले. सुनीलने 'चला लल्लन हीरो बनने' या फिल्मी चॅनलवरील शोमध्ये मुव्ही जॉकी म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. टीव्हीवर येण्यापूर्वी सुनीलने दिल्लीतील रेडिओ मिर्ची या रेडिओ स्टेशनवर काम केले होते. येथे तो हंसी के फब्बारे हा शो होस्ट करत होता. यात त्याच्या पात्राचे नाव सुदर्शन होते.

2000मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण
सुनीलने बॉलिवूड सुपरस्टार्स आमिर खान आणि अजय देवगण यांच्यासह काम केले. 2000मध्ये आलेल्या 'प्यार तो होना ही था' या चित्रपटात त्याने अजय देवगणसह काम केले. हा त्याला पहिलाच बॉलिवूड चित्रपट होता. मात्र यात त्याला दोनच सीन मिळाले होते. त्यानंतर सुनील पुन्हा एकदा अजयसह 'द लीजेंड ऑफ भगतसिंह' (2002) मध्ये दिसला. यातही त्याच्या वाट्याला खूप कमी भूमिका आली. 2008मध्ये आलेल्या 'गजिनी' ब्लॉकब्लस्टरमध्ये सुनीलने आमिर खानसह काम केले होते. या चित्रपटात त्याने असिनच्या मित्राची भूमिका साकारली होती.

सुनीलच्या गाजलेल्या गुत्थी या पात्रामाधील एक रंजक कहाणी आहे. सुनीलला या पात्राची प्रेरणा त्याच्या कॉलेजच्या एका क्लासमेटकडून मिळाली होती. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली आहे.

सुनीलने सांगितल्यानुसार, कुठेही परफॉर्म करण्यापूर्वी तो आपले सगळे जोक त्याची पत्नी आरतीला ऐकवतो. जर ती त्याच्या जोक्सवर हसली तर तो परफॉर्म करतो आणि जर तिला हसू आले नाही, तर ते जोक्स तो प्रेक्षकांसमोर सादर करत नाही. सुनीलची पत्नी आरती व्यवसायने इंटेरिअर डिझायनर आहे. या दोघांना एक मुलगा आहे.

बातम्या आणखी आहेत...