आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोवरने अलीकडेच त्याच्या संघर्षाच्या दिवसांना उजाळा दिला. अनीस बज्मींच्या 'प्यार तो होना ही था' या चित्रपटातून करिअरची सुरुवात झाल्याचे सुनीलने सांगितले. या चित्रपटात त्याने न्हावी तोतारामची भूमिका साकारली होती, जो चुकून अजय देवगणच्या मिशा कापतो.
कॉलेजच्या दिवसांत सुनीलला मिळाला होता पहिला चित्रपट
मॅशेबल इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सुनील ग्रोव्हरने सांगितले, 'मी त्यावेळी चंदीगडमध्ये होतो आणि माझे कॉलेजचे पहिले वर्ष सुरू होते. त्या काळात मी कॉलेजमध्ये नाटकांत काम करायचो. चित्रपटाचे निर्माते शूटिंगसाठी तिथे आले होते. स्थानिक नाट्य वर्तुळाशी संबंधित कोणीतरी त्यांना माझ्याबद्दल सांगितले. त्यानंतर मी अनीस बज्मी सरांना भेटायला गेलो आणि त्यांनी मला त्या भूमिकेसाठी फायनल केले.'
जसपाल भट्टी यांना ओळखले अभिनय कौशल्य
सुनीलने सांगितल्यानुसार, प्रसिद्ध कॉमेडियन जसपाल भट्टी यांच्याकडून तो कॉमेडीशी संबंधित बारकावे शिकला. तो म्हणाला- 'मी एकदा जसपाल भट्टी यांच्याकडे ऑडिशनसाठी गेलो होतो. त्यांनी मला एक छोटी भूमिका दिली. त्यानंतर त्यांनी मला इतर अनेक भूमिका दिल्या. हळूहळू मी त्यांच्यासोबत शो करू लागलो. तिथून मला कॉमेडीची समज आली. पूर्वी मी फक्त मिमिक्री करून लोकांना हसवण्याचा प्रयत्न करायचो,' असे सुनीलने सांगितले.
जसपाल भट्टी हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध विनोदी कलाकार होते. 90 च्या दशकातील त्यांचे दूरदर्शनवरील फुल टेंशन, फ्लॉप शो आणि मिनी कॅप्सूल हे कार्यक्रम खूप गाजले होते.
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल शर्मा' या शोमधून प्रसिद्ध झाला सुनील
टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणाऱ्या सुनीलने आरजेचीही भूमिका बजावली होती. रेडिओ मिर्चीवरील ‘हँसी के फँवारे’ या प्रसिद्ध रेडिओ शो सुनील ग्रोवरचाच आवाज होता. या शोद्वारे तो सुदर्शन म्हणजेच आरजे ‘सुद’ म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या सुनीलने काही चित्रपटांमध्ये छोटेखानी भूमिकाही साकारल्या. ‘द लेजेंड ऑफ भगत सिंग’, ‘जिला गाजियाबाद’, ‘गब्बर इज बॅक’, ‘बाघी’ या चित्रपटांमध्ये सुनील झळकला. 2016 मध्ये त्याने ‘बैसाखी लिस्ट’ या चित्रपटाद्वारे पंजाबी चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले.
पुढे 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल शर्मा' आणि 'द कपिल शर्मा शो'मधून सुनील ग्रोवरने छोट्या पडद्यावर आपली छाप उमटवली. कपिल शर्मासोबत झालेल्या वादानंतर सुनीलने हा शो सोडला होता. सुनील शोमधून बाहेर पडल्यानंतर शोच्या टीआरपीला मोठा फटका बसला होता. 'द कपिल शर्मा शो' सोडल्यानंतर सुनील 'सनफ्लॉवर' आणि 'तांडव' या वेब सिरीजमध्ये दिसला. अलीकडेच तो 'युनायटेड कच्चे' या सिरीजमध्ये झळकला. ही वेब सिरीज झी 5 वर स्ट्रीम होतोय.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.