आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेब सीरिज 'सनफ्लॉवर'चा रिव्ह्यू:गाेंधळून टाकणारी वेब सीरिज, यात क्लायमेक्स आधी आणि कथा नंतर दाखवण्यात आली

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'सनफ्लॉवर' ही वेब सीरिज झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे.
  • कलाकार - सुनील ग्रोव्हर, रणवीर शौरी, मुकुल चड्ढा, गिरीश कुलकर्णी, सोनल झा, आशीष विद्यार्थी, अनुपमा सोनी
  • दिग्दर्शक- विकास बहल, राहुल सेनगुप्ता
  • स्टार - 1.5/5

आजच्या काळात कथाच हीरो असतात, त्याच पडद्यावर आणि टीव्हीवर यशस्वी होतात. मात्र सीरिज आणि कथेमधून कथाच गायब झाली तर त्याचा काय परिणाम होईल, याचा अंदाज सहजच लावला जाऊ शकतो. काहीशी अशीच अवस्था वेब सीरिज 'सनफ्लॉवर'ची झाली आहे. यात क्लायमेक्स आधी आणि कथा नंतर दाखवण्यात आली.

कथेत मुंबईच्या सनफ्लॉवर सोसायटीत राज कपूर (अश्विन कौशल)ची हत्या त्याचा शेजारी मि. अहुजा (मुकुल चड्‌ढा) आणि मिसेज अहुजा (राधा भट्‌ट) नारळपाण्यात विष टाकून करतात. कार पार्किंगवरून दोघांचे भांडण होत होते. या खुनाचा तपास इन्स्पेक्टर दिगेंद्र (रणवीर शौरी), सबइन्स्पेक्टर तांबे (गिरीश कुलकर्णी) आणि त्यांची टीम करते. सुरुवातीला सोनू सिंह (सुनील ग्रोव्हर)व्यतिरिक्त मि. अहुजा आणि इमारतीत काम करणारी बाई, वाॅचमनवर संशय होतो. त्यानंतर भोळ्याभाबड्या आणि खरं बोलणाऱ्या सोनू सिंहवर दाट संशय होतो.

दुसरीकडे आशिष विद्यार्थी (दिलीप अय्यर) सोसायटीत वर्चस्व करणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत आहे. पूर्ण कथेत अनेक पात्रे आहेत. ती कधी-कधी कथेत येत-जात असतात. या पात्रांमुळे ही मर्डर मिस्ट्री कथा आणखीच गोंधळून टाकते. शेवटी पोलिस हत्येचा तपास करण्यात यशस्वी होतात का ? गुन्हेगार पकडला जाताे का ? हे सर्व आठ भागांची सीरिज पाहिल्यानंतरच कळेल.

दुसरा नंबर अभिनयाचा येतो. कसलेले कलाकार सुनील ग्रोव्हर, रणवीर शौरी, मुकुल चड्‌ढा, आशिष विद्यार्थी, गिरीश कुलकर्णी सर्वांनीच आपल्या भूमिकेत जीव ओतला आहे. मात्र या कथाच नसल्यामुळे कसलेले कलाकार असूनही काही फायदा होत नाही. या वेब सीरिजमध्ये कलाकारांना अशी पात्रे दिली आहेत जी सामान्य माणसांशी कुठेच मिळतजुळत नाहीत.

कथेत मसाला टाकण्यासाठी मि. आणि मिसेज अहुजाचे बेड सीनदेखील दाखवण्यात आले आहेत. ते बळजबरी टाकण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर वाॅचमन आणि काम करणाऱ्या बाईचा प्रेमप्रसंगदेखील नकली वाटतो. पूर्ण सोसायटी आणि पोलिसांच्या कामाची पद्धत इतकी हळू दाखवली की सर्वच कंटाळवाणं आणि डोकेदुखी वाटतं. सध्या तर घरबसल्या टाइमपास होत नाही. त्यामुळे ही सीरिज पाहण्यास काही हरकत नाही. अनेक पात्रे असलेली ही कथा गोंधळून टाकणारी आहे. त्यामुळे हिला पाचपेक्षा दीड दीड स्टार देता येऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...