आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्याचे सडेतोड उत्तर:सुनील पालने मनोज बाजपेयीला म्हटले होते खालच्या पातळीला गेलेली व्यक्ती, आता मनोज म्हणाला - 'मला समजू शकतं लोकांकडे काम नाही'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय आहे संपूर्ण प्रकरण?

'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' फेम विनोदवीर सुनील पालने काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. सुनीलने 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजचा पॉर्न असा उल्लेख केला होता. सोबतच त्याने मनोज वाजपेयीला उद्धट आणि खालच्या पातळीची व्यक्ती म्हटले होते. यावर आता अभिनेता मनोज बाजपेयीने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज बाजपेयी म्हणाला, 'मला समजू शकतं की लोकांकडे काम नाही. खरं तर मी ही गोष्ट चांगलीच समजू शकतो, कारण मी देखील अशी परिस्थिती पाहिली आहे. मात्र अशा परिस्थितीत लोकांनी ध्यान करावे,' असे म्हणत मनोज बाजपेयीने सुनील पालवर पलटवार केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
सुनील पालने राज कुंद्रा पॉर्न प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मनोज बाजपेयीवर निशाणा साधला होता. तो म्हणाला होता की, इंडस्ट्री नेहमीपासून असेच करत आली आहे. म्हणजेच अश्लील कंटेंट बनवणे... एक मोठा कलाकार असूनही मनोज 'द फॅमिली मॅन'सारखे शो करत आहे आणि अश्लीलतेला प्रोत्साहन देत आहे.

  • एका बातचीतमध्ये सुनील पालने राज कुंद्राच्या अटकेनंतर म्हटले होते, 'जे झाले ते व्हायलाच पाहिजे होते, हे गरजेचे होते. कारण मोठे लोक डिजिटल प्लॅटफॉर्मवर सेन्सॉरशिप नसल्याचा गैरफायदा घेत आहेत, आणि आक्षेपार्ह भाषेत शो बनवत आहेत.'
  • सुनील पाल मनोज वायपेयीबद्दल बोलताना म्हणाला होता, 'मनोज वाजपेयी कितीही मोठा अभिनेता असेल त्याला मोठे पुरस्कार मिळाले असतील मात्र त्याच्या एवढा उर्मट आणि खालच्या पातळीला गेलेला माणूस मी पाहिला नाही. त्याला देशातील कितीही मोठा पुरस्कार मिळाला असेल मात्र तो पॉर्न सारखा कंटेंट बनवतो.'
  • ‘द फॅमिली मॅन 2’ मध्ये श्रीकांत तिवारीची पत्नी सूचीचे अरविंदसोबत असलेल्या नात्यावर सुनीलने कमेंट केली होती. सूची आणि अरविंदचे नाते तसेच श्रीकांत तिवारीच्या मुलीचे कथानक यावर सुनील पालने आक्षेप घेतला होता. पॉर्न फक्त दिसण्याने नसतो तर विचारांचा देखील असतो, असे सुनील म्हणाला होता.
बातम्या आणखी आहेत...