आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुहूर्त ठरला!:सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा पहिलावहिला चित्रपट 'या' दिवशी येतोय थिएटरमध्ये, सोबत झळकणार तारा सुतारिया

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेते सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टी लवकरच 'तडप - अ‍ॅन इनक्रेडिबल लव स्टोरी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. नुकतीच या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नाडियाडवाला ग्रैंडसन एंटरटेन्मेंटचा हा चित्रपट येत्या 3 डिसेंबर 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत अहान शेट्टीचे हे बॉलिवूड पदार्पण एका वारशाला पुढे घेऊन जाणारे आहे, कारण सुनील शेट्टीलादेखील यांनीच लाँच केले होते आणि पुन्हा एकदा या योगदानाबद्दल ते उत्साहित आहेत.

अहानसोबत चित्रपटात तारा सुतारिया झळकणार आहे. ताराने दोन वर्षांपूर्वी या शोबिजमध्ये प्रवेश केला असून छोट्याशा अवधीत आपल्या समकालीनांमध्ये आपली जागा बनवली आहे.

अहान शेट्टी आणि तारा सुतारिया एका नव्या फ्रेश जोडीसोबत सर्वात रोमांचक पद्धतीने समोर येणारी प्रेम कहाणी, प्रेक्षकांसाठी निश्चितपणे एक छानशी ट्रीट असेल. 'तडप'मधील अहानच्या फर्स्ट लुकने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली असून एक नवा चेहरा पाहण्यासाठी सगळे उत्साहित आहेत.

चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करताना, नाडियाडवाला ग्रैंडसनने आपल्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.

'तडप' मिलन लूथरिया दिग्दर्शित चित्रपट असून अहान शेट्टी, तारा सुतारिया, सौरभ शुक्ला, कुमुद मिश्रा आणि सुमित गुलाटी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला हे असून फॉक्स स्टार स्टूडियोद्वारा सह-निर्मित आहे. चित्रपटाची कथा रजत अरोरा यांनी लिहिली असून प्रीतम यांनी संगीतबद्ध केले आहे.

बातम्या आणखी आहेत...