आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासनी देओलने 5 मार्च रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सनी देओल बैलगाडीवर बसलेल्या शेतकऱ्याशी बोलत होता. मात्र, विशेष बाब म्हणजे शेतकऱ्याला तो सनी देओलशी बोलत असल्याचे माहीत नव्हते.
सनीसोबत झालेल्या संवादादरम्यान शेतकरी म्हणतो, 'तुम्ही तर सनी देओलसारखे दिसता.' यावर अभिनेता म्हणाला की, मी सनी देओलच आहे. हे ऐकून शेतकरी पुरता हैराण झाला. सनी सध्या अहमदनगर येथे त्याच्या गदर 2 चित्रपटाचे शूटिंग करत आहे.
शेतकरी म्हणाला- मी तुमचे वडील धर्मेंद्र यांचे व्हिडिओ पाहतो
सनी देओलला आधी ओळखले नाही म्हणून शेतकऱ्याने त्याची माफी मागितली आणि सांगितले की, तो त्याचे वडील धरमजी यांचे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर पाहतो. सनीने सांगितले की, हे सर्व बघून त्याला त्याचे गाव आठवते. हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर करत सनीने लिहिले की, 'अहमदनगरमध्ये गदरच्या शूटिंगदरम्यान.'
11 ऑगस्टला रिलीज होणार गदर 2
गदर 2 बद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट 11 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा 2001 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट गदरचा सिक्वेल आहे. मागील चित्रपटाप्रमाणे या चित्रपटाचेही दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूरच्या अॅनिमल आणि विवेक अग्निहोत्रीच्या 'द वॅक्सीन वॉर'शी टक्कर होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.