आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या उपद्रवासाठी शेतकरी नेत्यांनी दीप सिद्धूला जबाबदार धरले आहे. ट्रॅक्टर रॅलीत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना दीप सिद्धूने उपद्रव करायला उद्युक्त केले, त्यानंतर शेतकऱ्यांनी लाल किल्ल्याकडे कूच केली, असा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. दरम्यान दीप सिद्धूचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात तो सनी देओल आणि पीएम नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिसतोय. या छायाचित्रावर सनी यांनी एका पोस्टद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.
लाल किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर सनी देओल यांनी मंगळवारी एक पोस्ट शेअर केली. 'आज लाल किल्यावर जे काही घडले ते बघून माझे मन खूप दुखी झाले आहे. मी यापूर्वीही 6 डिसेंबरला ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले होते की, माझा किंवा माझ्या कुटुंबाचा दीप सिद्धूशी कोणताही संबध नाही,' अशा आशयाची पोस्ट सनी देओल यांनी शेअर केली आहे.
चर्चेत आलेला दीप सिद्धू कोण आहे?
दीप सिद्धूचा जन्म 1984 मध्ये पंजाबमधील मुक्तसरमध्ये झाला आहे. तो एक मॉडल आणि अभिनेता आहे. 'रमता जोगी' या चित्रपटातून त्यांने सिनेक्षेत्रात प्रवेश केला होता. इतकेच नाही तर त्याने कायद्याची पदवीही घेतली आहे. 2019 मध्ये गुरुदासपूर येथून भाजपा उमेदवार सनी देओल यांच्यासाठी त्याने प्रचार केला होता.
दीप सिद्धूने सर्व आरोप फेटाळले
दीप सिद्धू यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून त्याच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आंदोलनकर्त्यांनी लोकशाहीच्या अधिकारानुसारच लाल किल्ल्यावर निशान साहिबचा झेंडा फडकावला. आम्ही भारतीय झेंडा हटवला नाही", असे दिप सिद्धूने स्पष्टीकरण दिले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.