आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देओल कुटुंबात कोरोनाचा शिरकाव:अभिनेते आणि भाजपा खासदार सनी देओल यांना कोरोनाची लागण,  कुल्लूतील फार्म हाऊसमध्ये आहेत क्वारंटाइन

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सनी देओल गेल्या काही महिन्यांपासून कुल्लू येथे वास्तव्यास होते.

देओल कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे थोरले चिरंजीव आणि चित्रपट अभिनेते व भाजपाचे गुरूदासपुरचे खासदार सनी देओल यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव यांनी मंगळवारी सनी देओल यांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. सनी देओल गेल्या काही महिन्यांपासून कुल्लू येथे वास्तव्यास होते अशी माहिती आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी दिली आहे.

पीटीआयशी बोलताना अमिताभ अवस्थी यांनी सांगितले की, “कुल्लूच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सनी देओल आणि त्याचे मित्र मुंबईकडे रवाना होण्याची तयारी करत होते. परंतु त्यादरम्यान मंगळवारी सनी देओल यांना कोरोनाची लागण झाली.”

सनी देओल यांनी मागील आठवड्यात मुंबईत आपल्या खांद्यावर शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर पीटीआयच्या वृत्तानुसार ते कुल्लूतील फार्म हाऊसमध्ये उपचार घेत होते. येथेच त्यांचा कोविड 19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सनी देओल यांना कोरोनाची लक्षणे नसून ते सध्या कुल्लूतील फार्म हाऊसमध्ये क्वारंटाइन असल्याचे त्यांच्या टीमने सांगितले आहे.

'अपने 2'ची झाली घोषणा
धर्मेंद्र यांनी अलीकडेच 2007 मध्ये आलेल्या 'अपने' या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. 'अपने 2' या चित्रपटात देओल कुटुंबाच्या तीन पिढ्या एकत्र झळकणार आहेत. दिव्य मराठीसोबत बोलताना या दिवसाची मी वाट पाहात होतो, अशी प्रतिक्रिया धर्मेंद्र यांनी व्यक्त केली होती. 'अपने 2' मध्ये धर्मेंद्र यांच्यासह सनी देओल, बॉबी देओलसह करण देओल झळकणार आहे. करण हा सनी देओल यांचा थोरला मुलगा आहे. मार्च 2021 मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून पुढील वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser