आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी:सनी-डेनियलच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण, लास वेगासच्या एका रेस्तराँमध्ये सनीला बघताच क्षणी प्रेमात पडला होता डेनियल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डेनियलने या खास दिनाचे औचित्य साधत सनीला डायमंड नेकलेस भेट म्हणून दिला आहे.

सनी लिओनी आणि डेनियल वेबर यांच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने सनीने डेनियलसाठी सोशल मीडियावर एक इमोशनल नोट लिहित दोघांचा एक खास फोटो शेअर केला आहे. सनीने लिहिले, 'ज्या व्यक्तीवर माझे जीवापाड प्रेम आहे, त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शेवटच्या श्वासापर्यंत आपण सोबत राहू, अशी मी प्रार्थना करते,' अशा आशयाचे कॅप्शन सनीने दिले आहे.

तर डेनियलने या खास दिनाचे औचित्य साधत सनीला डायमंड नेकलेस भेट म्हणून दिला आहे.

रील लाइफमध्ये कायम बोल्ड रुपात दिसणारी सनी खासगी आयुष्यात अतिशय मृदुभाषी आहे. डेनियलने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत आपल्या नात्याविषयी सांगितले होते.

लास वेगासमध्ये झाली होती पहिली भेट

डेनियलने सांगतो, 'मी सनीला पहिल्यांदा लास वेगासच्या एका रेस्तराँमध्ये पाहिले होते. मी येथे आपल्या बँड शोसाठी गेलो होतो, आणि सनी तिच्या फ्रेंड्सोबत सुटी घालवण्यासाठी तिथे आली होती. पहिल्याच नजरेतच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. माझा एक मित्र तिला ओळखत होता.'

तर सनी म्हणते, 'त्या दिवशी डेनियल माझ्याकडे आला आणि माझे नाव विचारून त्याच्या टेबलवर जाऊन बसला. त्यानंतर मी जेव्हा कधी त्या रेस्तराँमध्ये जायचे तेव्हा मला एक पुष्पगुच्छ मिळायचे. डेनियलची हिच अदा मला भावली.'

पुढे सनीने सांगितले, 'डेनियलने कुठून तरी माझा नंबर आणि ईमेल आयडी शोधला. त्याने मला कॉल केला नाही, त्याने मला मेल केला आणि हेच मला आवडले. येथूनच आमचे बोलणे सुरु झाले. एकदा मी न्यूयॉर्कमध्ये जात होते. तोसुध्दा तिथेच राहायचा. त्याने मला ईमेलमध्ये लिहेले की, 'तु मला कधीच तुझा नंबर देणार नाही का? तेव्हा मी माझा नंबर दिला आणि त्याने मला डेटसाठी विचारले. पहिल्या डेटवर मी उशीरा पोहोचले होते. परंतू त्याने माझी वाट पाहिली. मी तिथे पोहोचल्यावर आम्ही खुप गप्पा मारल्या. जवळपास तीन तास आम्ही बोललो. असे वाटले की, आम्ही पहिल्यापासूनच एकमेकांना ओळखत आहोत."

सनी सांगते, 'डेटिंगच्या काही महिन्यांनंतर माझ्या आईचे निधन झाले. मी डिप्रेशनमध्ये होते. मी आयुष्यात खुप निराश झाला होते, अशा परिस्थितीत कोणताही मुलगा मला सोडून निघून गेला असता, परंतू डेनियल माझ्यासोबत राहिला. फक्त माझ्यासाठीच नाही, तर माझ्या कुटूंबासाठीही तो माझ्यासोबत होता. मी दिवस रात्र रडत असायचे आणि तो मला सांभाळायचा. तो माझ्या जवळ राहिला. परिस्थिती समजून घेतली. हेच माझ्यासाठी महत्त्वाचे होते."

डेनियलने सनीला असे केले होते प्रपोज
सनी म्हणते, "मला आठवते, हे सर्व कालची गोष्ट असल्यासारखे वाटते, मी माझी रिंग ठेवण्यासाठी एक बॉक्स शोधत होते. तेव्हाच डेनियलने मला एक सुंदर बॉक्स दिला. हा बॉक्स त्याने स्वतः बनवला होता. यावर - विद लव्ह डेनियल असे लिहिलेले होते. मी बॉक्सविषयी खुप एक्सायटेड होते. तेव्हाच तो म्हणाला, माझ्याकडे तुझ्यासाठी अजून एक रिंग आहे. मी खुप आनंदी झाले. मला जसे प्रपोज हवे होते, त्याने त्याच प्रकारे मला प्रपोज केले होते." तीन वर्षे डेटिंगनंतर 2011 मध्ये सनीने डेनियलसोबत लग्न केले. पारंपरिक पद्धतीने दोघांचे लग्न झाले होते.

तीन मुलांची आई आहे सनी लियोनी
16 जुलै 2017 ला सनी आणि डेनियलने लातूरच्या एका अनाथाश्रमातून निशाला दत्तक घेतले. त्यावेळी निशा 21 महिन्यांची होती. याशिवाय सनी आणि डेनियल यांना जुनी मुले आहेत. तीन वर्षांपूर्वी सरोगसीच्या माध्यमातून अशर आणि नूह यांचा जन्म झाला होता.

बातम्या आणखी आहेत...