आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा13 मे रोजी बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी 40 वर्षांची झाली आहे. सनीचा जन्म 1981 मध्ये कॅनडाच्या सर्निया ओंटारियो येथे एका पंजाबी शीख कुटुंबात झाला होता. करणजीत कौर वोहरा हे तिचे खरे नाव आहे. करियरच्या सुरुवातीच्या काळात सनीने जर्मन बेकरी आणि कर आणि सेवानिवृत्ती कंपनीत काम केले होते.
'कलयुग'साठी झाली होती विचारणा
'कलयुग' (2005) या चित्रपटासाठी चित्रपट निर्माता मोहित सुरीने सनी लिओनीशी संपर्क साधला होता, हे क्वचितच लोकांना ठाऊक असावे. खरं तर, 'बिग बॉस -5' (2011) या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यापूर्वीच सनीच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी चर्चा सुरू झाली होती. मोहित सुरीने तिला 'कलयुग'मध्ये कास्ट करण्याचा विचार केला होता. मात्र मानधनाहून ही चर्चा फिस्कटली. सनीने या चित्रपटासाठी मोहित सुरीकडे 6 कोटींची मागणी केली होती. मात्र एवढे मानधन देण्यास मोहित सुरी तयार नव्हते.
'कलयुग' हा चित्रपट 2005 मध्ये आला होता. त्याकाळानुसार, एवढे मानधन मोहित यांना त्यांच्या बजेटबाहेरचे वाटले होते. म्हणून मोहित यांनी सनीला एवढे मानधन देण्यास स्पष्ट नकार दिला. नंतर मोहित यांनी त्यांची धाकटी बहीण स्माइली सुरी, दीपल शॉ आणि अमृता सिंग यांच्यासह हा चित्रपट बनवला. यासह कुणाल खेमू आणि इमरान हाश्मी चित्रपटात मुख्य भूमिकेत होते.
त्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सनीला लागली 7 वर्षे
'कलयुग' रिलीज झाल्यानंतर जवळपास 7 वर्षांनंतर सनी लिओनीने भट्ट कॅम्पच्या 'जिस्म -2' (2012) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पूजा भट्ट दिग्दर्शित या चित्रपटात सनीसह बॉलिवूड अभिनेता रणदीप हूडा मुख्य भूमिकेत दिसला होता. चित्रपट फारसा चालला नाही, परंतु सनीच्या कामाचे कौतुक झाले. त्यानंतर तिला एकापाठोपाठ एक चित्रपट मिळू लागले होते.
'बिग बॉस' मधून मिळाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री
2011 मध्ये 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोच्या पाचव्या पर्वात सनीने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. बिग बॉसच्या घरातच तिला बॉलिवूडमध्ये पदार्पणाची ऑफर मिळाली होती. या शोच्या एका एपिसोडमध्ये दिग्दर्शक महेश भट्ट पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. त्यांनी येथे सनीला त्यांच्या चित्रपटाची ऑफर दिली होती. मात्र सनीचे डेब्यू यशस्वी राहिले नाही.
'जिस्म 2' (2012) नंतर सनीने 'जॅकपॉट' (2013), 'रागिनी एमएमएस 2' (2014), 'एक पहेली लीला' (2015), 'कुछ कुछ लोचा है' (2015) आणि 'मस्तीजादे' (2016), 'वन नाइट स्टँड' (2016) यासारख्या चित्रपटात काम करून प्रसिद्धी एकवटली. टीव्ही शो 'स्प्लिट्सविला'च्या सातव्या आणि आठव्या पर्व तिने होस्ट केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.