आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने अभिनेत्री सनी लिओनीने आपली व्यथा सोशल मीडियावरुन मांडली आहे. तिने सांगितल्यानुसार, बॉलिवूडने तिला अवॉर्ड शोमधून केवळ बॉयकॉटच केले नव्हते तर तिच्यावर जजमेंटल आणि सेक्सिएस्ट कमेंटदेखील केल्या. आज मात्र ती आपले ड्रीम लाइफ जगत असल्याचे तिने सांगितले. सनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपबिती सांगितली आहे.
'वयाच्या 21 व्या वर्षी तिरस्काराचे मेल आले'
सनीने व्हिडिओमध्ये धक्कादायक खुलासा केला. ती सांगते, "जेव्हा मी 21 वर्षांची होती, तेव्हा लोक माझा तिरस्कार करणारे मेल करायचे. जजमेंटल आणि सेक्सिएस्ट कमेंट मला मिळाल्या. माझ्या डान्सवर टीका झाली. मला काम मिळणे बंद झाले होते. कोणीही पसंत करत नसल्याने अवॉर्ड शोमधून मला बॉयकॉट केले गेले होते. माझ्या प्रत्येक गोष्टीची खिल्ली उडवली गेली. इंडस्ट्रीतून कधीच ना काम मिळाले ना पाठिंबा मिळाला. मात्र हार न मानता, न खचता मी काम करत राहिले. सुरुवातीला लोकांनी काम देणे बंद केले, नाकारले. पण आज मी माझी ड्रिम लाइफ जगतेय. आजवरचे सर्वात मोठे ब्लॉकबस्टर बेबी डॉल हे गाणे दिले. माझ्याजवळ आज एक सुंदर कुटुंब आहे. मी एक यशस्वी बिझनेस वुमन आहे. आता स्वतःची मेकअप लाइन सुरु केली आहे. मी जे काही आहे, त्याचा मला अभिमान आहे. मी स्वबळावर यशस्वी महिला ठरले आहे,' असे सनीने सांगितले.
2011 मध्ये सनी कॅनडाहून मुंबईत आली होती सनी
2011 मध्ये सनी लिओनी कॅनडाहून मुंबईला आली होती. कलर्स चॅनलच्या 'बिग बॉस'च्या पाचव्या पर्वात तिची वाईल्ड कार्ड एंट्री झाली होती. येथूनच तिला बॉलिवूडचा मार्ग गवसला. दिग्दर्शक महेश भट्ट शोच्या एका एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून आले होते आणि त्यांनी सनीला त्यांच्या 'जिस्म 2' या चित्रपटाची ऑफर दिली. खरं तर सनीला सुरुवातीला यश मिळाले नाही. 'जिस्म 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला, पण सनीला चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या.
सनी लिओनीने 'जिस्म 2' (2012), 'जॅकपॉट' (2013), 'रागिनी एमएमएस 2' (2014), 'एक पहेली लीला' (2015), 'कुछ कुछ लोचा है' (2015) आणि 'मस्तीजादे' (2016) यासारख्या चित्रपटात काम करून प्रसिद्धी एकवटली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.