आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपकमिंग:अमिताभ बच्चन यांनी लाँच केला 'क्रॅकडाऊन'चा फर्स्ट लूक, पहिल्यांदाच अ‍ॅक्शन वेब सीरिजमध्ये झळकणार श्रिया पिळगावकर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अ‍ॅक्शनने भरलेला टीझर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा आहे.

अपूर्व लखिया दिग्दर्शित क्रॅकडाऊन या अ‍ॅक्शन थ्रिलर वेब सीरिजचा फर्स्ट लूक बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी लाँच केला आहे. बिग बींनी आपल्या ट्विटर अकाऊटंवर वेब सीरिजचा फर्स्ट लूक शेअर करुन अपूर्व लखिया यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अ‍ॅक्शनने भरलेला टीझर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा आहे.

विशेष म्हणजे या वेब सीरिजच्या माध्यमातून अभिनेते सचिन पिळगावकर यांची कन्या आणि अभिनेत्री श्रिया पिळगावकर पहिल्यांदाच अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. या सीरिजसाठी श्रियाने दोन महिने हँड टू हँड फायटिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. यामध्ये श्रियासोबत साकिब सलीमची मुख्य भूमिका आहे. इक्बाल खान, वलुचा, राजेश तेलंग आणि अंकुर भाटिया हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत यात झळकणार आहेत. ही सीरिज वूट सिलेक्ट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 23 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

बातम्या आणखी आहेत...