आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपकमिंग फिल्म:सुपरस्टार धनुषच्या 'कर्णन'चा फर्स्ट लूक आउट, रिलीज डेटही आली समोर

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका सत्य घटनेवर आधारित हा अ‍ॅक्शन चित्रपट आहे. -

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई आणि अभिनेता धनुष लवकच ‘कर्णन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. आता धनुषने या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली असून हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर धनुषने या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूकही शेअर केला आहे.

एप्रिलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट
धनुषने सोशल मीडियावर चित्रपटातील फर्स्ट लूक आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या पोस्टरवर चित्रपटाची रिलीज डेटही दिसतेय. हा चित्रपट यावर्षी 9 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये धनुषचा जबरदस्त लूक दिसत आहे. धनुषचा लूक पाहिल्यानंतर चाहत्यांची चित्रपट बघण्याची उत्सुक्ता शिगेला पोहचली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक मेल्वा सेल्वराज यांनीही चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. कर्णनचा फर्स्ट लूक रिलीज करताना खूप आनंद झाला आहे, असे ते म्हणाले आहेत. या चित्रपटाची निर्मिती कलाईपुली एस. थानू यांनी केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून धनुष आणि मारी पहिल्यांदाच सोबत काम करणार आहेत. तिरुनेवलीजवळ घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित हा अ‍ॅक्शन चित्रपट आहे.