आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनीकांत:एक बस कंडक्टर ते सुपरस्टार... राहणी इतकी साधी की, आहे त्या परिस्थितीशी घेतात जुळवून

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तामिळनाडूत निवडणुकीपूर्वी रजनीकांतना दादासाहेब फाळके पुरस्कार

सुपरस्टार रजनीकांत यांना चित्रपट क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रजनीकांत यांचे याबद्दल अभिनंदन केले. काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांनी राजकारणात उतरण्याची घोषणा केली होती. मात्र, अगदी निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी प्रकृतीचे कारण देत ही नवीन योजना टाळली होती.

अडचणीत असलेला कुणीच रजनीकांत यांच्या दारातून रिकाम्या हाताने जात नाही
एका अभिनेत्याचा करिश्मा सामान्य माणसाच्या जीवनावर प्रभाव टाकू शकतो. त्यांनी आपल्या कमाईचा बहुतांश भाग सामान्यांवरच खर्च केला आहे. अडचणीत असलेला कुणी त्यांच्याकडे आला तर तो कधीच रिकाम्या हाताने परतत नाही. रजनीकांत व्यक्ती नव्हे एक संस्थाच आहे. त्यांची राहणी अगदी साधी. सामान्य माणसासारखी... जे काही मिळेल त्यात ते आनंद मानतात. तरुण वयात रजनीकांत/ शिवाजी गायकवाड जन्मगावातच पारखे झाले. कित्येक दिवस बेघर फिरले. बंगळुरूत बस कंडक्टर म्हणून नोकरी करताना त्यांची कला एका चित्रपट निर्मात्याने पाहिली आणि त्यांना संधी दिली. ही खलनायकाची भूमिका इतकी गाजली की त्यांना नायकाहून अधिक प्रसिद्धी मिळाली. आता रजनीकांत यांना नायकाची भूमिका मिळाली आणि बॉक्स ऑफिसवर पैशाचा पाऊस सुरू झाला.

रजनीकांत दरवर्षी एक महिन्यासाठी परदेशात जातात. जाताना फक्त चार शर्ट आणि दोन जीन्स सोबत असतात. असा हा सुपरस्टार साधा-भोळा आहे. राजकारणात त्यांना कधीच रस नव्हता. मात्र, एक अभिनेता म्हणून त्यांना अनेकदा नावडत्या भूमिका कराव्या लागल्या. त्यांची मद्यप्राशनाची क्षमता चाहत्यांना आवडे. चाहत्यांना जपण्यासाठी रजनीकांत एका बाटलीत मद्यामध्ये पाणी अधिक मिसळून प्राशन करत. हे आवडत नसले तरी त्यांना ते करावे लागेल. त्यांनी ही अंतर्मनातील लढाई कौशल्याने जपली. आता ते सामान्य हृदयात कायम घर करून आहेत.
जयप्रकाश चौकसे, चित्रपट समीक्षक

बातम्या आणखी आहेत...