आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाला हरवायचं आहे!:सुपरस्टार रजनीकांत यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस, मुलगी सौंदर्या फोटो शेअर करत म्हणाली...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी त्वरित लस घेण्यासाठी सर्व आग्रही झाले आहेत. यात एंटरटेन्मेंट विश्वातील कलाकारदेखील लस घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या कुटुंबासह कोरोनाची लस घेतली होती. आता सुपरस्टार रजनीकांत यांनीही कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यांची मुलगी सौंदर्या हिने सोशल मीडियावर रजनीकांत यांचा लस घेतानाचा फोटो शेअर केला आहे.

सौंदर्या हिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, 'आपल्या थलैवानी लस घेतली आहे. कोरोना विषाणूविरूद्धचे हे युद्ध आपण एकत्र लढू आणि जिंकू या,' असा आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे. सोबत मास्क लावा आणि घरात सुरक्षित राहा, असे आवाहनदेखील तिने लोकांना केले आहे.

रजनीकांत यांचे निकटवर्तीय रियाझ के अहमद यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, रजनीकांत यांनी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात घेतल्याचे सांगितले आहे.

हैदराबादमध्ये अन्नाथेचे 35 दिवसांचे चित्रीकरण पूर्ण करुन अलीकडेच घरी परतले रजनीकांत
रजनीकांत तब्बल महिनाभर शूटिंग करुन हैदरबादहून अलीकडेच चेन्नईला परतले आहेत. चेन्नईला परतल्यानंतर त्यांनी कोरोना लसीचा डोस घेतला. हैदराबाद येथे रजनीकांत यांनी अन्नाथे या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. घरी परतल्यानंतर रजनीकांत यांच्या पत्नी लता त्यांना ओवाळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता.

35 दिवसांचे होते शेड्युल
रामोजी फिल्म सिटीत पूर्ण झालेल्या या चित्रपटाचे शूटिंग शेड्यूल 35 दिवसांचे होते. शिवा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रीकरण पूर्ण करुन रजनीकांत प्रायव्हेट जेटने चेन्नईला परतले. या चित्रपटाचे डिसेंबर 2020 मध्ये चित्रीकरण थांबवण्यात आले होते. त्यावेळी सेटवर 8 क्रू मेंबर्स कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

4 महिन्यांनंतर सेटवर पोहोचले होते रजनीकांत
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात बीपीच्या त्रासामुळे रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते चेन्नईला परतले होते. चार महिन्यांनी त्यांनी अन्नाथेचे चित्रीकरण सुरु केले होते. हा चित्रपट यंदा दिवाळीत रिलीज होऊ शकतो. रजनीकांत यांच्यासह चित्रपटात किर्ती सुरेश, मीना आणि खुशबू सुंदर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...