आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सुपरस्टार रजनीकांत यांना शुक्रवारी सकाळी हैदराबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 70 वर्षीय रजनीकांत यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. परंतू, रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. जोपर्यंत त्यांचा रक्तदाब सामान्य होत नाही, तोपर्यंत त्यांना डॉक्टरांच्या निगरानीत ठेवण्यात येईल.
रजनी यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह
रजनीकांत आणि नयनतारा त्यांच्या आगामी 'अन्नाथे' चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये आले आहेत. त्यांनी शूटिंगला सुरुवातही केली, मात्र शूटिंगच्या क्रूमधील 8 जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे शूटिंग थांबवण्यात आले. यानंतर, 22 डिसेंबर रोजी रजनीकांत यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, मात्र त्यांचा अहवाल कोरोना नेगिटिव्ह आढळून आला होता. तेव्हापासून त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केले होते.
पुढच्या वर्षी येणार रजनी यांचा चित्रपट आणि पक्ष
'अन्नाथे'मध्ये रजनीकांत आणि नयनतारासोबतच किर्ती सुरेश, मीना, खुशबू, प्रकाश राज आणि सूरी प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटात बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांचेही एक महत्वाचे पात्र आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शिवा करत असून, एप्रिल 2021 मध्ये चित्रपट रिलीज होणार आहे. दरम्यान, रजनी यांनी पुर्णवेळ राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी दोन्ही, त्यांचा चित्रपट आणि पक्ष येणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.