आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोन्नियन सेल्वनमध्ये सुपरस्टार रजनीकांत यांना करायचे होते काम:साकारायची होती पेरिया पजुवेत्तारैयारीची भूमिका, मणिरत्नम यांनी दिला नकार

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षीच्या बहुप्रतिक्षित पोन्नियन सेल्वन पार्ट-1 चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चेन्नईच्या नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन प्रमुख पाहुणे म्हणून पोहोचले होते. या कार्यक्रमात रजनीकांत यांनी खुलासा केला की, त्यांना पोन्नियन सेल्वनचा भाग व्हायचे आहे, परंतु चित्रपट निर्माते मणिरत्नम यांनी त्यांना चित्रपटात कास्ट करण्यास नकार दिला होता.

रजनीकांत यांना साकारायची होती पेरिया पजुवेत्तारैयारी ही भमिका
रजनीकांत यांनी सांगितले की, त्यांनी मणिरत्नम यांच्यासमोर पेरिया पजुवेत्तारैयारी ही भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली. इतकंच नाही तर रजनीकांत या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेसाठीही तयार होते, परंतु मणिरत्नम यांनी त्यांना भूमिका देण्यास साफ नकार दिला, असा खुलासा यावेळी रजनीकांत यांनी केला. इतकेच नाही तर मणिरत्नम यांचे कौतूक करताना रजनीकांत म्हणाले – 'मला वाटते की मणीच्या जागी दुसरे कोणी असते तर कदाचित तो ही भूमिका द्यायला तयार झाला असता, पण मणीने नकार दिला. म्हणूनच तो मणिरत्नम आहे,' अशा शब्दांत त्यांनी मणिरत्नम यांचे कौतूक केले.

चित्रपटात कमल हासन आणि श्रीदेवी यांना केले होते इमॅजिन
ट्रेलर लाँचच्या वेळी रजनीकांत म्हणाले की, 'मी जेव्हा चित्रपटाची कथा वाचली तेव्हा मला कमल हासन यांना अरुणमोझी वर्मन, कुंदावईच्या भूमिकेत श्रीदेवी, नंदिनीच्या भूमिकेत हेमा मालिनी, आदित्य करिकालनच्या भूमिकेत विजयकांत आणि पजुवेत्तारैयारीच्या भूमिकेत सत्यराज या कलाकारांची कल्पना केली होती. पण मला आणि कमलला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली नाही, असे ते म्हणाले. चित्रपटात तुम्हाला विक्रम, जयराम रवी, ऐश्वर्या राय प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत, ज्यासाठी मी खूप आनंदी आहे, असेही रजनीकांत यांनी म्हटले.

ऐतिहासिक ड्रामा चित्रपट
पोन्नियन सेल्वन हा चोल साम्राज्याच्या कथेवर आधारित ऐतिहासिक ड्रामा आहे. चित्रपटाची कथा प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. येत्या 30 सप्टेंबर रोजी चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम प्रस्थापित करेल अशी आशा निर्मात्यांना आहे.

बातम्या आणखी आहेत...