आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत मृत्यू प्रकरण:CBI तपासाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी दाखल केली होती याचिका, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले  - आम्ही यावर विचार करणार नाही, उच्च न्यायालयात जा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता जवळपास 9 महिने उलटले आहेत. त्याच्या मृत्यूची चौकशी सीबीआय करत आहे. याप्रकरणातील सीबीआय तपासाचा कुठवर आला आहे, हे जाणून घेण्यासाठी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. बुधवारी सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी सुनावणी करताना म्हटले की, आम्ही यावर विचार करणार नाही, त्यामुळे ही याचिका फेटाळली जातेय. उच्च न्यायालयात जा, तिथे या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती
पुनीत धांडा यांनी सीबीआय चौकशीची स्थिती जाणून घेण्यासाठी ही याचिका सुमारे 4 महिन्यांपूर्वी दाखल केली होती. पुनीत यांनी याचिकेत अपील केली होती की, सर्वोच्च न्यायालयाने तपास यंत्रणेचा तपास कुठवर आला आहे, हे सांगण्याचे निर्देश द्यावे. तसेच तपास यंत्रणांनी हे प्रकरण दोन महिन्यांत पूर्ण करावे अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती. तसेच अंतिम तपास अहवाल न्यायालयात सादर करण्याची मागणीदेखील केली होती.

सीबीआय जबाबदारीने काम करत नाही
याचिकाकर्त्याने युक्तिवाद केला होता की, न्यायालयाने तपासाचा कालावधी निश्चित करुन द्यायला हवा, जेणेकरुन निकाल वेळेत येऊ शकेल. याचिकेत म्हटले गेले होते, "सीबीआय जबाबदारीने काम करत नाहीये आणि या प्रकरणातील चौकशीला उशीर होत आहे. विशेष म्हणजे 19 ऑगस्ट 2020 रोजी सीबीआयला सुशांतच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश मिळाले होते. तपास करूनही सीबीआय अद्याप कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलेले नाही. सुशांतचा मृत्यू कसा झाला हे त्याचे कुटुंब, मित्र आणि चाहते जाणून घेऊ इच्छित आहेत."

बातम्या आणखी आहेत...