आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'तांडव' वाद:सर्वोच्च न्यायालयाचा 'तांडव'चे निर्माते आणि कलाकारांना अंतरिम संरक्षण देण्यास नकार, म्हटले- तुम्ही धार्मिक भावना दुखावू शकत नाहीत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • न्यायालयाने म्हटले - तुम्ही उच्च न्यायालयात जाऊ शकता

'तांडव' या वेब सीरिजचे निर्माते आणि कलाकारांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मोठा झटका दिला. न्यायालयाने मेकर्स आणि कलाकारांना अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला आहे. तुम्ही लोकांच्या धार्मिक भावना दुखावू शकत नाहीत, असे यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान सहा वेगवेगळ्या राज्यात दाखल झालेल्या एफआयआर वर्ग करणे आणि त्या एकत्र करण्याच्या अपीलवर न्यायालयाने नोटिस जारी केली आहे.

‘तांडव’ ही वेब सीरिज प्रदर्शनापासूनच वादाच्या केंद्रस्थानी आहे. या वेब सीरिजमधील काही संवाद धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे आक्षेप आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये या वेब सीरिजचे निर्माते आणि कलाकारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ‘तांडव’चे दिग्दर्शक अली अब्बास जफर, अ‍ॅमेझॉन प्राईम इंडियाच्या प्रमुख अपर्णा पुरोहित, निर्माता हिमांशु मेहरा आणि ‘तांडव’चे लेखक गौरव सोलंकी आणि अभिनेता मोहम्मद झिशान अयुब या सर्वांकडून सर्वोच्च न्यायालयात तीन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या तिन्ही याचिकांवर न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती एम.आर. शहा यांच्या खंडपाठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने या सर्वांना तातडीने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला.

न्यायालयाने म्हटले - तुम्ही उच्च न्यायालयात जाऊ शकता
अटकपूर्व जामीन किंवा गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात जावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. आम्ही कलम 482 CrPC अंतर्गत दिलेल्या अधिकाराचा वापर करु शकत नाही. त्यामुळे आम्ही अंतरिम संरक्षण बहाल करु शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले.