आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूडप्रमाणेच कन्नड फिल्म इंडस्ट्री म्हणजेच सँडलवूडमध्येही सीसीबीची धरपकड सुरु होती. ज्यात अभिनेत्री रागिनी द्विवेदीला अटक करण्यात आली होती. रागिनी 90 दिवसांपासून तुरूंगात आहे. तिच्या जामीनाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने कर्नाटक सरकारकडे उत्तर मागितले आहे. रागिनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे की, रागिनी द्विवेदीला केवळ एका चुकीच्या विधानाच्या आधारे या प्रकरणात अडकवण्यात आले असून ती मीडिया ट्रायलला बळी पडली आहे.
दावा -रागिनीकडून ड्रग्ज मिळाले नाही तरीही तिला अटक रागिनी द्विवेदीने आपल्या याचिकेत म्हटले की, कोणत्याही पुराव्याशिवाय तिला 90 दिवसांपासून तुरूंगात ठेवण्यात आले आहे. न्यायमूर्ती आर.एफ. नरिमन, न्यायमूर्ती नवीन सिन्हा आणि के.एम. जोसेफ यांनी या याचिकेवर कर्नाटक सरकारकडे उत्तर मागितले आहे.
रागिनीचे वकील सिद्धार्थ लुथरा यांनी खंडपीठाला सांगितले की, रागिनीकडे ड्रग्ज सापडले नाही आणि संपूर्ण प्रकरण पोलिसांसमोर एका आरोपीने दिलेल्या जबाबावर आधारित आहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुढील सुनावणी
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालय आता या खटल्याची पुढील सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी, रागिनीने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या 3 नोव्हेंबरच्या आदेशाला आव्हान देणारी स्पेशल लीव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. 4 सप्टेंबर रोजी संजना गलराणी आणि रागिनी यांना बेंगळुरू मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती.
रागिणी द्विवेदीचा जन्म बेंगळुरू येथे झाला होता. तर तिचे कुटुंब हरियाणाच्या रेवाडी येथील आहे. 2009 मध्ये 'वीरा मदाकारी' या सिनेमातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर तिला केम्पे गौडा, रागिनी आयपीएस, बंगारी आणि शिवा सारख्या सिनेमांमधून प्रसिद्धी मिळाली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.