आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता अय्युब यांना फटकारले; लोकांच्या धार्मिक भावनांना तुम्ही दुखावू शकत नाहीत!

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘तांडव’चे निर्माता, लेखक, अभिनेत्याच्या अटकेच्या स्थगितीस नकार

वेब सिरीज तांडवचे निर्माता हिमांशू मेहरा, दिग्दर्शक अब्बास जफर, लेखक गौरव सोळंकी व अभिनेता मोहंमद झिशान अय्युब यांना झटका बसला आहे. अॅमेझॉन इंडियाने या सर्वांच्या अटकेला स्थगिती देण्याची मागणी केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावताना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने या सर्वांवरील खटल्यांची सुनावणी एकत्रित केली जाण्याबाबत नोटीस जारी केली आहे. आता यासंबंधीची सुनावणी ४ आठवड्यांनंतर होणार आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या या वेब सिरीजच्या विरोधात ६ राज्यांत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्ट लाइव्ह : दृश्ये हटवली, माफीही मागितली : याचिकाकर्ते

याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील फली नरिमन, अॅमेझॉन इंडियाचे मुकुल रोहतगी, चित्रपट दिग्दर्शक व लेखकासाठी सिद्धार्थ लुथरा, अभिनेता अय्युब यांच्यासाठी सिद्धार्थ अग्रवाल यांनी युक्तिवाद केला.

नरिमन : सिरीजमधील आक्षेप असलेली दृश्ये आम्ही हटवली, माफीही मागितली.

न्यायमूर्ती भूषण : सर्व याचिका रद्द कराव्या, असे तुम्हाला वाटते. त्यासाठी हायकोर्टात जावे.

नरिमन : या देशात कलम १९ ए आहे. त्यानुसार माझ्या हक्कावर परिणाम व्हायला नको.

न्या. भूषण : संविधानातील कलम २१ ही आहे. तुम्ही हायकोर्टात जावे.

रोहतगी : कलम १९ ए साठी थेट सुप्रीम कोर्टात जाता येऊ शकते.

लुथरा : माझ्या अशिलाच्या विरोधात गुन्हे दाखल होत आहेत. अटक होऊ शकते. त्याला स्थगिती द्यावी.

रोहतगी : हे एक राजकीय विडंबन आहे. लोक अशा गोष्टींवरही दुखावले गेले तर हळूहळू देशात कला, सिनेमा, टीव्ही सगळे नाहीसे होईल.

अग्रवाल : एखाद्या व्यक्तिरेखेच्या संवादासाठी अभिनेत्याला जबाबदार ठरवले जाऊ शकत नाही.

न्यायमूर्ती शहा : तुम्ही वेब सिरीजची संहिता वाचूनच करार केला असावा. मग तुमची जबाबदारी नाही असे तुम्ही कसे काय म्हणू शकता? तुम्ही लोकांच्या धार्मिक भावना दुखावू शकत नाही.

अग्रवाल : व्यक्तिरेखेच्या दृश्याबद्दल अभिनेत्याला सांगितले जात नाही.

रोहतगी : किमान सर्व खटल्यांची एकत्रितपणे सुनावणी तरी घ्यावी.

न्यायमूर्ती शहा : आम्ही सर्व खटल्यांना एका जागी हस्तांतरित करण्याच्या मुद्द्यावर नोटीस जारी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...