आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:नवीन व्हायरल थिअरीत सूरज पंचोलीवर लागला सुशांतची हत्या केल्याचा आरोप, वडील आदित्य म्हणाले -  हा काय वेडेपणा आहे

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सोशल मीडियावर काही न्यूज व्हायरल होत आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील अनेक सिद्धांत सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी एकामध्ये अभिनेता आदित्य पंचोलीचा मुलगा सूरज याच्यावर सुशांतचा खून केल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर त्याच्यावर सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सॅलियन हिची देखील हत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तथापि, संपूर्ण प्रकरणात आदित्यने आपली भूमिका कायम ठेवत मुलावरील आरोपांना निराधार म्हटले आहे.

  •  व्हायरल होत असलेल्या थिअरीत काय म्हटले आहे? 

असे म्हटले जात आहे की, दिशा आणि सूरज रिलेशनशिपमध्ये होते. दिशाला सूरजपासून दिवस गेले. परंतु सूरज तिच्याशी लग्न करण्यास तयार नव्हता. सुशांतला जेव्हा हे समजले तेव्हा त्याने दिशाच्या बाजूने भूमिका घेण्याचा प्रयत्न केला. सुशांतने सूरजचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न सुरू केला. सूरज आणि त्याच्यात भांडणही झाले होते. त्यानंतर सूड उगवण्यासाठी सूरजच्या कुटुंबाने सलमान खान आणि अंडरवर्ल्डसोबत मिळून सुशांतला ठार मारले आणि आता आपली पावर वापरत त्याला आत्महत्येचा रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. या थिअरीत दिशाच्या आत्महत्येवरुनही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. दिशाने खरंच 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली? की कुणी तरी तिला ढकलले? असे प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.

  • आता आदित्य पंचोलीने दिले स्पष्टीकरण 

आदित्य पंचोली या संदर्भात स्पष्टीकरण देताना म्हणाले- मी कालपासून याबद्दल वाचत आहे. या विचित्र मुलाबद्दल. याने थोड्या काळापूर्वी थोडाफार अभिनय केला आहे. पुनीत वशिष्ठ हे त्याचे नाव आहे. त्याने आपल्या फेसबुक पेजवर काहीतरी वेड्यासारखे लिहिले आहे.

त्यात त्याने असे लिहिले आहे की 'हे सर्व घडले कारण सुशांतची मॅनेजर दिशा सॅलियन सूरज पंचोलीच्या मुलाची आई होणार होती. तिने सूरजमुळे आत्महत्या केली. सुशांतला त्याबद्दल आवाज उठवणार होता, म्हणून त्याने सुशांतचीही हत्या केली.' हा काय वेडेपणा आहे?, असे आदित्य पंचोलीने म्हटले आहे. 

सुरजने आधीच त्याच्या आयुष्यात खूप त्रास सहन केला आहे. त्याला विनाकारण जिआ खानच्या आत्महत्या प्रकरणात ओढले गेले होते आणि आता या प्रकरणात ओढले जात आहे. मग लोक विचारतात, अखेर कुणी नैराश्यात का जातो आणि आत्महत्या करतो. 

जर वारंवार अशाप्रकारे एखाद्याचे नाव ओढले जात असेल तर एक सामर्थ्यवान माणूस देखील कोलमडून जाईल. सूरजचे बरेचसे जीवन आणि करिअर उध्वस्त झाले आहे. तो एक अतिशय हुशार, साधा आणि सभ्य मुलगा आहे.

  • आदित्य पंचोलीच्या दृष्टिकोनातून 2017 मध्ये सुशांत-सूरजच्या भांडणाचे सत्य

असा दावा केला जातोय की, 2017 मध्ये एका पार्टीदरम्यान सुशांत आणि सूरजमध्ये भांडण झाले होते. यानंतर सलमान खानने सुशांतला फोन करून फटकारले होते. या घटनेसंदर्भात आदित्य पंचोली म्हणाले- 2017 मध्ये सुशांत आणि सूरजमध्ये भांडण झाल्याचे काही रिपोर्टमध्ये लिहिले गेले आणि सलमान सूरजच्या बचावात आला आणि सुशांतवर ओरडला. मात्र वास्तवात अशी कोणतीही घटना घडली नाही. खुद्द सूरजने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

गोष्टींचा सामना करण्याचा हा मार्ग नाही. उद्या जर सूरज नैराश्यात गेला आणि देव न करो पण त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले तर काय? याला जबाबदार कोण असेल? हे अत्यंत धक्कादायक आणि वाईट आहे.

जर कुठल्याही बाबतीत त्याची चूक असेल तर त्याने तुरूंगात जावे. कोणताही पुरावा नाही. काही सिद्ध झाले नाही, तरीही त्याला सर्व गोष्टींमध्ये का ओढले जात आहे? लोक गेलेल्यांसाठी प्रार्थना करतात. पण जे जिवंत आहेत त्यांना किमान शांततेत जगू द्या, असे आदित्य पंचोलीने म्हटले आहे. 

  • सूरज पंचोलीचे स्पष्टीकरण  

सूरज आपल्या स्पष्टीकरणात म्हणाला- सुशांतबरोबर कोणत्या भांडणाबद्दल बोलले जात आहे, ते मला माहित नाही. माझा त्याच्याशी कधी वाद झाला नाही. मी यापूर्वी हे स्पष्ट केले आहे. दुसरे म्हणजे, सलमान खान माझ्या आयुष्यात का सामील होतील? त्यांना दुसरे काम नाही का?

मला माहित नाही की दिशा कोण आहे? मी तिला कधीच भेटलो नाही. सुशांतच्या मृत्यूनंतर मला तिच्याबद्दल समजले. आणि मला दोघांच्या कुटूंबाबद्दल वाईट वाटले. कोणीतरी आपल्या फेसबुक पेजवर हा मूर्खपणा लिहिला आहे. चित्रपटाच्या स्क्रिप्टप्रमाणे बनवले आणि ते व्हायरल होऊ लागले.

  • सूरजच्या नजरेत 2017 च्या भांडणाचे सत्य

सूरजने 2017 च्या कथित भांडणाची अफवा म्हणून वर्णन केले आणि तो म्हणाला - सुशांत 3 वर्षांपूर्वी माझ्याकडे आला होता जेव्हा आमच्यात (सुशांत आणि सूरज) भांडणाची बातमी आली. त्याने मला सांगितले की, भाई एक फालतू लेख आला आहे की, सलमान माझ्यावर रागावले आहेत. हे क्लिअर करण्यासाठी तू स्टेटमेंट देशील का?

त्या बातमीनुसार सुशांतने मला शिवीगाळ केली होती, असा उल्लेख होता. म्हणून कदाचित त्याला माझे स्टेटमेंट हवे होते. आम्ही एका मित्राच्या डिनर पार्टीत भेटलो होतो. फनी फोटो काढले गेले होते ज्याला भांडणाचा रंग देण्यात आला होता.

आमच्या दोघांकडे एकमेकांचा नंबर होता. त्याने मला त्याच्या चित्रपटांच्या स्क्रिनिंगसाठीही आमंत्रित केले होते. मी 'राब्ता'च्या स्क्रिनिंगलाही गेलो होतो. आपल्या संपूर्ण आयुष्यात आम्ही चार किंवा पाच वेळा भेटलो होतो. अलीकडील काळात मी त्याच्या संपर्कात नव्हतो. कारण आमच्या दोघांमधील मैत्री खूप घनिष्ठ नव्हती. केवळ एकाच इंडस्ट्रीतील असल्याने आम्ही एकमेकांना ओळखत होतो.

  • मग वारंवार तुझं नाव वादात का अडकतं?

याचे उत्तर देताना सूरज म्हणतो- जेव्हा तुम्हाला सलमान खानने लाँच केले असते आणि नेपोटिज्मवरुन वाद सुरु असतो, तेव्हा असे होणे साहजिकच आहे. पण नेपोटिज्मने सर्व काही होणार असते, तर आतापर्यंत मी दहा चित्रपट तरी नक्की केले असते. नेपोटिज्मचा माझ्या कामाशी काही संबंध नाही.

मी अगदी लहान वयातच 2010 मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरवात केली. हा चित्रपट 'गुजारिश' होता. त्यानंतर दोन वर्षांनी मी 'एक था टायगर' केला. तिथे मी सलमान सरांना भेटलो आणि त्यांनी मला सांगितले की, जर त्यांनी एखादा चित्रपट बनवला तर ते मला लाँच करतील. कारण, त्यांनी माझ्यातील क्षमता ओळखली होती. त्यांनी मला असेही सांगितले होते की, जर मला अभिनेता व्हायचे असेल तर मला अधिक मेहनत घ्यावी लागेल. कधीही उठून हीरो होता येत नाही.

त्यानंतरही माझी स्वत:ची मेहनत होती. मी 'काय पो चे' साठी ऑडिशनही दिली आणि रिजेक्ट झालो. त्यानंतर मी स्वत: वर काम केले. 2 वर्षानंतर मला 'हिरो' मिळाला. माझी आई 60 वर्षांची आहे आणि 30 वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये आहे. ती आजही चित्रपटांसाठी ऑडिशन देते. त्यामुळे स्टार किड्सला ऑडिशन देण्याची गरज नाही हे एक मिथक आहे.

बातम्या आणखी आहेत...