आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुरेखा सिक्री हेल्थ अपडेट:उपचार करणा-यांना डॉक्टरांनी सांगितले - स्ट्रोकमुळे सुरेखा सिक्री यांच्या मेंदुत झाली क्लॉटिंग, फुफ्फुसात लिक्विड जमा झाले

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुरेखा सिक्री मागील 36 तासांहून अधिक काळापासून आयसीयूमध्ये आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर जुहूमधील क्रिटीकेअर रुग्णालयाच्या आयसीयूत उपचार सुरु आहेत. मंगळवारी सकाळी ज्युस पित असताना अचानक त्यांना ब्रेन स्ट्रोक आला अशी माहिती त्यांच्या नर्सने दिली आहे आहे. रुग्णालयाचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. आशुतोष शेट्टी यांनी 75 वर्षीय सुरेखा सिक्री यांच्या तब्येतीविषयी अपडेट दिले आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, सुरेखा यांच्या फुफ्फुसात जमा झालेले लिक्विड तपासणीसाठी पाठविले जाईल. सुरेखा मागील 36 तासांहून अधिक काळापासून आयसीयूमध्ये आहेत.

  • औषधांच्या मदतीने क्लॉट काढला जाईल

ईटाइम्सच्या वृत्तानुसार, सुरेखा उपचारांना चांगला प्रतिसाद देत नाहीयेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, स्ट्रोकमुळे त्यांच्या मेंदुत क्लॉट झाला आहे, जो औषधांच्या मदतीने काढला जाईल. मात्र सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

  • मदतीसाठी पुढे आले कलाकार

सुरेखा यांच्याकडे उपचारांसाठी पुरेसे पैसे नसल्याचे त्यांच्या नर्सने सांगितले आहे. त्यानंतर अनेक कलाकार त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. ‘बधाई हो’ या चित्रपटातील त्यांचे सहकलाकार गजराज राव आणि दिग्दर्शक अमित शर्मा त्यांच्या आर्थिक मदतीसाठी धावून आले. अभिनेता सोनू सूदनेही त्यांच्यापर्यंत मदत पोहोचल्याचे सांगितले आहे.

  • दोन वर्षांपूर्वीही आला होता ब्रेन स्ट्रोक

सुरेखा यांना 2018 मध्येही ब्रेक स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांच्या देखभालीसाठी एका नर्सची नियुक्ती करण्यात आली. अलीकडेच त्या ‘बधाई हो’ या चित्रपटात झळकल्या होत्या.