आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत मृत्यू प्रकरण:एम्सची फॉरेन्सिक टीम पुढील आठवड्यात सीबीआयकडे सोपवणार फायनल रिपोर्ट, ड्रग्ज प्रकरणात नाव आल्याने रकुलप्रीत सिंगची कोर्टात धाव

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ड्रग्ज प्रकरणात मीडियामध्ये नाव समोर आल्यानंतर रकुल प्रीत सिंहने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सुशांत प्रकरणाची चौकशी करणारी सीबीआय टीम दिल्ली येथे पोहोचली असून गुरुवारी ते एम्सच्या डॉक्टरांना भेटू शकतात. पुढील आठवड्यात एम्सची टीम आपला अंतिम अहवाल सीबीआयकडे सोपवण्याची शक्यता आहे.

  • यासाठी झाले होते मेडिकल बोर्डचे गठन

7 सप्टेंबर रोजी एम्सच्या पाच सदस्यीय फॉरेन्सिक तज्ज्ञांची एक टीम तयार केली गेली होती, ज्याला सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील फाइल्स पाहण्याची जबाबदारी देण्यात आली होती. व्हिसेरा चाचणीद्वारे सुशांतला विषबाधा झाली होती की नाही याची शक्यता शोधण्यासाठी या टीमला हे काम देण्यात आले होते. या प्रकरणात सीबीआयने एम्सची मदत मागितली होती.

एम्सच्या फोरेंसिंक डिपार्टमेंटचे हेड डॉ. सुधीर गुप्ता यांनी काही दिवसांपू्र्वी सांगितले होते की, सुशांतची हत्या झाली का? या अँगलनेही तपास केला जाईल. व्हिसेराचा तपास केला जाईल. सुशांतला डिप्रेशन दूर करण्यासाठी दिल्या गेलेल्या गोळ्यांचे परीक्षण केले जाईल.

  • ड्रग्ज अँगलमध्ये नाव आल्यानंतर रकुल प्रीत सिंग उच्च न्यायालयात पोहोचली

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, रिया चक्रवर्तीने ड्रग्ज अँगलच्या चौकशीदरम्यान अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिचे नाव घेतले आहे. ड्रग्ज प्रकरणात मीडियामध्ये नाव समोर आल्यानंतर रकुल प्रीत सिंहने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रकुलने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. रकुलने याचिकेत आपल्याविरोधात सुरु असलेले ‘मीडिया ट्रायल’ थांबवले जावेत अशी मागणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे. तसेच मीडियामध्ये दाखवण्यात आलेल्या गोष्टींमुळे प्रतिमा मलीन होत असल्याचाही उल्लेख केला आहे.

सुशांत सिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी ड्रग्ज चॅट समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी)ने रिया चक्रवर्तीला ड्रग्ज सेवनासह अन्य आरोपांखाली अटक केली असून सध्या ती भायखळा तुरुंगात आहे. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार सुरु असलेल्या चौकशीमध्ये रियाने 25 बड्या कलाकारांची नावे घेतली होती. यात रकुलप्रीतसह सारा अली खान फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांच्या नावांचा समावेश असल्याचे म्हटलेे गेले. त्यानंतर रकुलने दिल्ली हायकोर्टात या विरुद्ध याचिका दाखल केली आहे.