आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ड्रग्ज प्रकरणात समोर येत आहेत मोठी नावे:एनसीबीच्या यादीत सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांचे नाव असल्याचा दावा, दोन प्रसिद्ध अभिनेत्रींचीही नावे चर्चेत

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीपासूनच सुशांत सिंह राजपूत मुकेश छाब्रांचा मित्र होता. सुशांतच्या काय पो छे या पहिल्या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा होते.
  • असा दावा केला जात आहे की, रियाने एनसीबीला 20 पानी जबाब दिला असून यात अनेक सेलिब्रिटींच्या नावांचा उल्लेख केला आहे.
  • या यादीत सुशांतची मैत्रीण आणि रेनड्रॉप मीडियाची फाऊंडर रोहिणी अय्यर हिचे देखील नाव असल्याचे समजते.

ड्रग्ज प्रकरणात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'चे दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांचे नाव समोर आले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो त्यांना चौकशीसाठी बोलवू शकते. केआरके नावाने प्रसिद्ध असलेल्या चित्रपट समीक्षक कमल राशिद खान यांनी आपल्या ट्विटमध्ये हा दावा केला आहे.

  • इतर चार जणांची नावेही पुढे येत आहेत

ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीला अटक झाल्यापासून, तिने आपल्या जबाबात बॉलिवूडच्या 25 प्रसिद्ध सेलिब्रिटींची नावे एनसीबीला सांगितली असल्याचे म्हटले जात आहे. मुकेश छाब्रा व्यतिरिक्त अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रीत सिंग, फॅशन डिझायनर सिमो खंबाटा आणि सुशांतची मैत्रीण आणि रेनड्रॉप मीडियाची फाऊंडर रोहिणी अय्यर हिचे देखील नाव असल्याचे समजते.

  • रियाने 20 पानांचा जबाब नोंदवला

टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, रिया चक्रवर्तीने एनसीबीला दिलेल्या 20 पानांच्या जबाबात सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा यांनी ड्रग्ज सेवन केल्याचे सांगितले आहे. आम्ही जेव्हा याबाबत एनसीबीच्या अधिका-यांना विचारला केली असता, त्यांनी याची पुष्टी केली नाही. पण खंडनदेखील केले नाही.

  • सारा, रकुल, सिमोनविषयी केला जातोय हा दावा

काही रिपोर्ट्समध्ये दावा केला आहे की, सारा 2018 मध्ये सुशांत सिंह राजपूतसोबत थायलंड ट्रीपला गेली असताना तिने ड्रग्ज घेतले होते. तर रकुलचेही नावही रियाने एनसीबीच्या चौकशीत घेतले आहे. सिमोनचे नाव रियासोबतच्या तिच्या व्हॉट्सअॅप चॅटवरुन समोर आले आहे.

  • रिया 22 सप्टेंबरपर्यंत तुरूंगात राहणार

रियाला 9 सप्टेंबर रोजी ड्रग्जच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. एनसीबीसमोर तिने कबूल केले की, सॅम्युअल मिरांडा आणि शोविक चक्रवर्ती यांच्यामार्फत सुशांतला ड्रग्ज मिळत असे. तिला 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रियाने सत्र न्यायालयात अर्ज केला, तो शुक्रवारी फेटाळून लावण्यात आला. पुढील आठवड्यात तिचे वकील सतीश मानशिंदे उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल करु शकतात.