आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रग्ज प्रकरणात यश:एनसीबीने 2 ड्रग पेडलर्सना केली अटक; रिया-सुशांतविषयी मिळाली बरीच माहिती, अडीच कोटींचा चरसही जप्त

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत प्रकरणात एनसीबी ड्रग्ज अँगलची चौकशी करत आहे. या प्रकरणात रिया आणि तिचा भाऊ शोविक यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत.

अभिनेता सुशांत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगलचा तपास करणार्‍या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोला (एनसीबी) चौकशीत मोठे यश मिळाले आहे. एजन्सीने दोन ड्रग पेडलर्सना अटक केली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकून तब्बल अडीच कोटींचा चरसही जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती असल्याचा दावा एनसीबीच्या एका अधिका-याने केला आहे. जिनेंद्र जैन उर्फ ​​रीगल महाकाल आणि मोहम्मद आझम जुम्मन शेख असे अटक केलेल्या पेडलर्सची नावे आहेत.

भास्करला एका अधिका-याने सांगितले की, दोन्ही पेडलर्स 2 दिवसांच्या रिमांडवर आहेत. रीगल महाकालने सुशांत आणि रियाशी संबंधित अनेक रहस्येही उघड केली आहेत. या नंतर रिया आणि या प्रकरणाशी संबंधित लोकांच्या अडचणी वाढू शकतात. अधिका-याने सांगितले की, रिया-शोविकला पुन्हा ताब्यात घेतले जाईल की नाही, याविषयी अद्याप काही सांगता येणार नाही, परंतु आम्हाला या प्रकरणात आता जे इनपुट मिळाले आहेत, ते मोठा टर्निंग पॉईंट आहे आणि यावेळी जप्त करण्यात आलेला ड्रग्जचा साठाही मोठा आहे.

अधिका-यांचा दावा - मुंबईतील ड्रग्ज सप्लायची संपूर्ण साखळी संपवली
अधिकारी म्हणाले- आजम जुम्मन शेख ड्रग्ज सप्लायर आहे. रीगल महाकालला तो ड्रग्ज पुरवत असे. रीगल हे ड्रग्ज अनुज केसवानीला पुरवायचा. अनुज हा कैजानचा सप्लाय करायचा. कैजान हेच ड्रग्ज सुशांत आणि रियाचा नोकर दीपेशला देत असे. आम्ही मुंबईमधून ड्रग्ज सप्लायरची संपूर्ण साखळी संपवली.

जप्त केलेल्या चरसला मलाना क्रीम म्हटले जाते. हे जगातील सर्वात जास्त मागणी असलेल्या चरस आहे. हे केवळ हिमाचलच्या मलाना भागात आढळते. आंतरराष्ट्रीय बाजारात मलाना क्रीमची किंमत प्रति किलो 40-50 लाख रुपये आहे.

रीगलकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर एनसीबीने मुंबईतील लोखंडवाला आणि मिल्लतनगर येथे छापा टाकला. रीगल महाकाल काही बॉलिवूड सेलिब्रिटींशीही संबंधित आहे. एनसीबी बराच काळापासून रीगलच्या शोधात होते.

भारती सिंह प्रकरणाचा याच्याशी काही संबंध नाही

कॉमेडियन भारती सिंह-हर्ष लिंबाचिया प्रकरणात रीगलचा काही संबंध नाही. भारतीच्या खटल्याची सुनावणी 14 डिसेंबर रोजी न्यायालयात होणार आहे. भारतीच्या बाबतीत एनसीबीने तीन रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्या होत्या.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser