आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत प्रकरणाच्या तपासाचा फैसला:सर्वोच्च न्यायालयाने दिले सीबीआय तपासाचे आदेश, म्हटले - मुंबई पोलिसांनी सहकार्य करावे, पाटण्यात दाखल केलेला एफआयआर योग्य होता

एका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • कोर्ट म्हणाले- सुशांत एक प्रतिभावान अभिनेता होता, निष्पक्ष आणि प्रभावी तपास आवश्यक आहे.
 • बिहार पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे सीबीआय चौकशी करणे योग्य नसल्याचे मत रियाने मांडले होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, सीबीआय तपासाला महाराष्ट्र सरकार आव्हान देऊ शकणार नाही. पाटण्यात दाखल करण्यात आलेला एफआयआर सर्वसमावेश असल्याचे सांगून न्यायालयाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे.

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने पाटण्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून केली होती. त्यावर आज न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

सुशांतच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदवण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही खटल्यांचा तपास सीबीआयने करावा असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्याचप्रमाणे या तपासात सीबीआयला मदत करण्याचे आदेश न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने निर्णयाविरोधात दाद मागण्यासंबंधी विचारणा केली. मात्र न्यायालयाने त्यासाठी नकार दिला.

सर्वोच्च न्यायालयाच्या 35 पानांच्या आदेशातील 5 मोठ्या गोष्टी

आता पुढे काय?

 • बिहार पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर बरोबर होती.
 • सीबीआय चौकशीचीही कायद्यानुसार शिफारस केली गेली.
 • मुंबई पोलिसांनी तपासात सहकार्य करावे, त्यांनी गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवावेत.
 • पुढील कोणतीही एफआयआर नोंदविल्यास सीबीआय त्याची चौकशी देखील करेल.
 • सुशांत एक प्रतिभावान अभिनेता होता. बरेच लोक निकालाची वाट पाहत आहेत, जेणेकरून तर्कांना पूर्णविराम लागेल. म्हणून, निष्पक्ष आणि प्रभावी तपास होणे आवश्यक आहे.

सीबीआय मुंबई पोलिसांना पत्र लिहून गेल्या 2 महिन्यांत त्यांनी जे काही पुरावे गोळा केले आहेत ते देण्यास सांगणार. वृत्तसंस्था आयएएनएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी या प्रकरणात ज्यांचे जबाब नोंदवले आहेत ते आणि या प्रकरणाशी संबंधित सर्व गॅझेट सीबीआयला सुपूर्त करावेत, अशीही मागणी सीबीआयकडून केली जाणार आहे.

अक्षय कुमार म्हणाला - कायम सत्याचा विजय व्हायला पाहिले

 • केंद्र सरकारने काय उत्तर दिले

सॉलिसिटर जनरल तुषार मेहताने म्हटले होते की, सीबीआय तपासाचा निर्णय योग्य आहे. मेहता यांनी मुंबई पोलिसांच्या पद्धतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी म्हटले की, मुंबई पोलिसांनी कोणताची एफआयआर दाखल केला नाही, नंतर 56 लोकांना समन पाठवून त्यांचा जबाब कसा नोंदवला?

सुशांत प्रकरणात ईडीने यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे, असा युक्तिवादही मेहता यांनी केला आहे. जेव्हा एखाद्या केंद्रीय एजन्सीने तपासणी सुरू केली असेल, तर इतर एजन्सींच्या तपासणीसही हरकत नसावी.

अपडेट्स

 • बिहार सरकारमध्ये मंत्री आणि जेडीयू नेता संजय झा यांनी म्हटले की, मुंबई पोलिस केस बंद करण्याचा प्रयत्न करत आहे असे वाटते. सुशांतच्या कुटुंबाकडून दाखल करण्यात आलेल्या एफआयआर नंतरच गंभीरतेने तपास सुरू होऊ शकला. आम्ही सुशांतच्या कुटुंबाला न्याय देऊ.
 • सशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने मंगळवारी महाभारताचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले - ‘अंधकार से प्रकाश की ओर ले चलो! शरणागति।’
बातम्या आणखी आहेत...