आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रियाच्या मालमत्तेशी संबंधित इनसाइड स्टोरी:रिया चक्रवर्तीच्या 3 कोटींच्या मालमत्तेची चौकशी करत आहे ईडी, 2018 नंतर खरेदी करण्यात आले हे तीन फ्लॅट

ज्योति शर्मा, मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • रिया चक्रवर्ती आपल्या एकाच फ्लॅटबद्दल ईडीला स्पष्टपणे सांगू शकली.
 • दोन फ्लॅटविषयी तिने समाधानकारक उत्तरे दिली नाही. आज पुन्हा मनी लाँडरिंग प्रकरणी तिची चौकशी सुरु आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्याविरूद्ध मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) तिचे उत्पन्न, खर्च आणि मालमत्ता तपासत आहे. ईडी रियाच्या ज्या तीन प्रॉपर्टीची चौकशी करत आहे, त्यापैकी एक खार भागात, दुसरी जुहू आणि तिसरी नवी मुंबईत आहे. या तीन मालमत्तेचे बाजार मूल्य एकत्रितपणे 3 कोटी रुपये आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 2018 नंतर रियाने या तीन मालमत्ता खरेदी केल्या.

 • रिया फक्त एक फ्लॅट विषयी सविस्तर माहिती देऊ शकली

या तीनपैकी एकाच मालमत्तेबद्दल रिया ईडीला सविस्तर माहिती देऊ शकली. खार भागात तिचा एक बीएचके फ्लॅट आहे. 322 चौरस फूट फ्लॅटची किंमत आजच्या भावानुसार सुमारे एक कोटी रुपये आहे. रियाने हा फ्लॅट 2018 मध्ये 76 लाख रुपयांमध्ये खरेदी केला होता. हा फ्लॅट तिने 51 हजार रुपयांत बुक केला होता, तर मे 2018 मध्ये त्याचे रजिस्ट्रेशन केले होते.

 • फक्त 10 टक्केच रक्कम आपल्या खात्यातून दिली

रियाने या फ्लॅटची फक्त 10% रक्कमच आपल्या खात्यातून दिली. यानंतरचे पेमेंट टप्प्याटप्यातून केले. जीएसटी, मुद्रांक शुल्क आणि इतर शुल्कासह या फ्लॅटसाठी रियाला 84 लाख रुपये द्यावे लागले. यासाठी रियाने एचडीएफसीकडून 55-60 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आणि बाकीचे रोख पैसे दिले होते. या फ्लॅटमध्ये रियाने तिची आई संध्या चक्रवर्ती यांना नॉमिनी केले आहे.

 • हा प्रोजेक्ट फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण होईल

हा फ्लॅट बनवणा-या बिल्डरच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, रिया स्वत: दोनदा बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेली होती. ती या प्रोजेक्टच्या मॅनेजरलादेखील भेटली होती. तिचे आईवडील संध्या आणि इंद्रजित चक्रवर्ती यांनीही येथे भेट दिली होती. ऑगस्ट 2022 मध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे हे काम रखडल्यामुळे आता तो फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण होऊ शकेल.

 • बिल्डर ईडीला सर्व कागदपत्रे देण्यास तयार

बिल्डरच्या कार्यालयाकडे अद्याप ईडीकडून विचारपूस केली गेली नाही. मात्र, बिल्डरच्या वतीने या चौकशीत पूर्ण पाठिंबा देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ते सर्व कागदपत्रे ईडीला देण्यास तयार असल्याचेही समजते.

 • रिया उर्वरित दोन फ्लॅट्सबाबत माहिती दिली नाही

रियाचा आणखी एक फ्लॅट जुहूमधील तारा रोड सांताक्रूझ स्थित प्राइम रोज नावाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आहे. 102 नंबरच्या या फ्लॅटचा बाजारभाव सुमारे दीड कोटी आहे. रिया येथे आपल्या कुटुंबासह राहते. डिसेंबर 2019 मध्ये युरोप दौर्‍यावरून परत आल्यानंतर रिया सुशांतला तिच्या याच फ्लॅटवर घेऊन गेली होती. तोपर्यंत रियाने सुशांतसोबत मिळून वांद्र्यामध्ये 4 बीएचके फ्लॅट भाड्याने घेतला नव्हता. रिया किंवा तिच्या कुटूंबाच्या नावावर हा फ्लॅट भाड्याने आहे, की तो खरेदी करण्यात आला आहे, याचा शोध घेण्याचा ईडी प्रयत्न करीत आहे.

रियाचा आणखी एक फ्लॅट नवी मुंबईतील उल्वे येथे आहे. या फ्लॅटचा बाजारभाव 50 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. सांताक्रूझ आणि उल्वेमधील मालमत्तेबद्दल रिया स्पष्टपणे काही सांगू शकली नाही. सोमवारी ईडीने तिला पुन्हा चौकशीसाठी बोलवले आहे. या दोन्ही फ्लॅटसंदर्भात तिची विचारपूस केली जाईल.

आतापर्यंत ईडीने या लोकांची चौकशी केली आहे

 • शुक्रवारी रिया चक्रवर्तीची सुमारे साडे आठ तास चौकशी केली गेली. यावेळी ईडीने तिचा भाऊ शोविक आणि वडील इंद्रजित चक्रवर्ती यांनाही प्रश्नोत्तरे केली.
 • शुक्रवारी रियाचे सीए रितेश शहा यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते.
 • सुशांत सिंह राजपूतचे माजी मॅनेजर श्रुती मोदी हिलादेखील शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले होते. तिने आपला जबाब ईडीकडे नोंदवला आहे.
 • शनिवारी रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीची सुमारे 18 तास चौकशी झाली. तो शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास ईडी कार्यालयात आला आणि रविवारी सकाळी 6:25 वाजता कार्यालयातून बाहेर पडला. यावेळी शोविकने बर्‍याच प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरे दिली, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सोमवारी पुन्हा त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
 • सुशांतचा फ्लॅटमेट आणि मित्र सिद्धार्थ पिठानीला शनिवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते, पण तो हजर झाला नाही. त्याला दुसरा समन पाठवून सोमवारी हजर राहण्यास सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...