आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत मृत्यू प्रकरणात नवीन खुलासा:सुशांतचा मृत्यू 14 जून रोजी सकाळी 11 ते 12 वाजेदरम्यान झाला, रुग्णालयाने दिला सप्लिमेंट्री पोस्टमार्टम रिपोर्ट

मुंबई2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
हा फोटो 14 जूनच्या दुपारचा आहे. मुंबई पोलिसांचे काही लोक आणि सुशांतच्या घरी काम करणारे लोक त्याचा मृतदेह घेऊन रुग्णालयात आले होते.
 • सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी आरोप केला होता की, ऑटॉप्सी रिपोर्टमध्ये बर्‍याच महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख नाही.
 • आता एम्सची फॉरेन्सिक टीम या शवविच्छेदन अहवालाची चौकशी करेल, यासाठी पाच डॉक्टरांचे पॅनेल तयार केले गेले आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पहिल्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या मृत्यूच्या वेळेचा उल्लेख नसल्याने मुंबईतील कूपर रूग्णालयावर टीका झाली होती. त्यानंतर आता कूपर रुग्णालयाच्या वतीने सुशांतचा सप्लिमेंट्री पोस्टमार्टम रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार, पोस्टमार्टम सुरू होण्याच्या 10 ते 12 तास आधी सुशांतचा मृत्यू झाला होता. सुशांतचे पोस्टमार्टम 14 जून रोजी रात्री 11 ते 12.30 दरम्यान झाले होते. त्यानुसार सुशांतचा मृत्यू सकाळी 11 ते 12 वाजेदरम्यान झाला असावा, असे म्हटले जात आहे.

 • पहिल्या रिपोर्टमध्ये मृत्यूची वेळ न देण्याचे कारण रुग्णालयाने स्पष्ट केले नाही

यापूर्वीच्या सात पानांच्या ऑटॉप्सी रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्यूची वेळ नमूद करण्यात आलेली नाही. पण असे का केले गेले, याचे रुग्णालयाकडून अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. या प्रकरणात सुशांतचे शवविच्छेदन करणा-या 5 डॉक्टरांच्या टीमची मुंबई पोलिस आणि सीबीआय पथकांनी चौकशी केली आहे.

कूपर रुग्णालयाच्या या पाच डॉक्टरांनी सुशांतचे पोस्टमार्टम केले, परंतु पहिल्या अहवालात मृत्यूची वेळ कुणीही दिली नव्हती.
कूपर रुग्णालयाच्या या पाच डॉक्टरांनी सुशांतचे पोस्टमार्टम केले, परंतु पहिल्या अहवालात मृत्यूची वेळ कुणीही दिली नव्हती.
 • सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी प्रश्न उपस्थित केले

सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी मृत्यूची वेळ न दिल्याने पोस्टमार्टम अहवालावर प्रश्न उपस्थित केला होता. सिंह म्हणाले होते - मृत्यूच्या वेळी ज्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला होता, त्याचा तपशील शवविच्छेदन अहवालात का नाही. शवविच्छेदन अहवालात मृत्यूची वेळ नमूद केलेली नाही. अखेर असे का केले गेले?, असा सवाल त्यांनी केला होता.

विकास सिंह यांनी हे प्रश्न उपस्थित केले

 • दिशा सालिआनच्या पार्थिवाचे शवविच्छेदन दोन दिवसानंतर झाले होते, तर सुशांतच्या पोस्टमार्टममध्ये एवढी घाई का करण्यात आली?
 • सुशांतच्या गळ्यावरील खुण आणि कपड्यांमध्ये फरक का आहे?
 • शवविच्छेदन अहवालात मृत्यूच्या वेळेचा उल्लेख का नाही?
 • साधारणत: संध्याकाळनंतर पोस्टमार्टम होत नाही, मग सुशांतचे पोस्टमार्टम रात्री का केले?
 • अखेर मुंबई पोलिस पोस्टमार्टम एवढ्या घाईत का केले होते?
सुशांतचा शवविच्छेदन अहवाल एकूण सात पानांचा आहे. या पानावर सुशांतच्या शरीरावर जखमा आढळल्याचा उल्लेख आहे.
सुशांतचा शवविच्छेदन अहवाल एकूण सात पानांचा आहे. या पानावर सुशांतच्या शरीरावर जखमा आढळल्याचा उल्लेख आहे.

सुशांतच्या ऑटॉप्सी रिपोर्टमधील मुख्य मुद्दे

 • सुशांतच्या शरीरावर कोणतीही जखम दिसली नाही.
 • घशाजवळील आणि डोक्याजवळील कोणतेही हाड मोडलेले नाही.
 • पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूच्या वेळेचा उल्लेख नाही.
 • सुशांतच्या मृतदेहाची कोरोना टेस्टही झाली नव्हती.
 • सुशांतच्या गळ्याचा घेर 49.5 सेंटीमीटर होता.
 • सुशांतच्या गळ्याच्या खाली 33 सेंटीमीटर लांबीचा 'लिगेचर मार्क' आढळला होता.
 • दोरीची खुण हनुवटीच्या खाली 8 सेंटीमीटर खाली होती.
 • घश्याच्या उजव्या बाजूला असलेल्या जखमेची जाडी 1 सेंटीमीटर होती.
 • घश्याच्या डाव्या बाजूला असलेल्या जखमेची जाडी 3.5 सेंटीमीटर होती.

एम्सची टीम ऑटोप्सी फायलींची चौकशी करेल

सुशांत सिंह राजपूतच्या ऑटोप्सी फायली तपासण्यासाठी एम्सने शुक्रवारी फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पाच सदस्यीय मेडिकल बोर्ड गठीत केले आहे. शुक्रवारी सीबीआयने याप्रकरणी एम्सचे मत जाणून घेतले. या पथकाचे नेतृत्व एम्सचे फॉरेन्सिक विभाग प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता करत आहेत. ते म्हणाले, “आम्ही हत्येच्या संभाव्यतेकडे लक्ष देऊ, जर सर्व शक्य अँगलने याची सखोल चौकशी केली जाईल.”

गुप्ता म्हणाले की, 'संरक्षित व्हिसेराचा तपास केला जाईल आणि सुशांतला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी देण्यात येणार्‍या औषधांचे विश्लेषण एम्स प्रयोगशाळेत केले जाईल."