आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sushant Had Signed Dil Bechara For Friendship Without Reading The Script,he Had Promisses To Mukesh Chhabra's To Work In The First Directorial

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांतचा शेवटचा चित्रपट:मित्रासाठी स्क्रिप्ट न वाचताच साइन केला होता 'दिल बेचारा', मुकेश छाबरांच्या पहिल्या डायरेक्टोरियलमध्ये काम करण्याचे दिले होते वचन 

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत आणि संजना सांघी स्टारर फिल्म 'दिल बेचारा' डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

मुकेश छाबरा आणि सुशांत सिंह राजपूत यांचा 'दिल बेचारा' हा फक्त एक चित्रपट नाही. तर हा निष्ठा आणि मैत्रीचा पुरावा आहे. सात वर्षांपूर्वी मुकेश छाबरा यांनी 'काय पो चे' या चित्रपटासाठी कास्टिंग दिग्दर्शक म्हणून काम केले होते. तब्बल 800 जणांच्या ऑडिशनंतर मुकेश यांनी सुशांतचे टॅलेंट ओळखले होते. तर त्यांनी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या चित्रपटात हीरो बनून सुशांतने मैत्री निभावली.  

मुकेश यांनी दिग्दर्शित केलेला त्यांचा पहिला चित्रपट 'दिल बेचारा' रिलीजसाठी सज्ज आहे. सुशांतच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, "माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला एक चांगला अभिनेता तसेच मला एक मित्र म्हणून समजून घेणारी जवळची व्यक्ती हवी आहे, हे मला माहित होतं. असं कोणीतरी, जो या संपूर्ण प्रवासात माझ्या बाजूने उभा असेल. मला आठवतंय की, सुशांतने मला खूप पूर्वी वचन दिलं होतं की जेव्हा कधी मी माझा पहिला चित्रपट दिग्दर्शित करेल तेव्हा त्यात तो मुख्य भूमिका साकारेल. त्याने दिलेलं वचन पाळलं. जेव्हा मी त्याला दिल बेचारासाठी संपर्क केला, तेव्हा त्याने स्क्रिप्ट न वाचताच लगेच होकार दिला. आमच्यात कायम भावनिक कनेक्शन होते."

  • तासन्तास बसून स्क्रिप्टवर चर्चा करायचो

मुकेश पुढे म्हणाले, "तो मला सीनमध्ये सुधारणा करण्यासाठी नेहमीच मदत करायचा. तो माझ्याबरोबर वाचन करायचा आणि जेव्हा त्याला सीनमध्ये काही सुधारणा हवी असायची, तेव्हा तो लगेच मला सांगायचा. आम्ही तासन्तास बसून स्क्रिप्टवर सविस्तर चर्चा करायचो."

24 जुलै 2020 रोजी सुशांत आणि संजना सांघी स्टारर फिल्म 'दिल बेचारा' डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. काही लोक सुशांतचा शेवटचा चित्रपट बघण्यास उत्सुक आहेत, तर काहींनी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. मुकेश छाबरांचा हा पहिला डायरेक्टोरियल चित्रपट आहे.

बातम्या आणखी आहेत...