आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत सुसाइड केस:यशराज फिल्म्सचे मालक आदित्य चोप्रांची चार तास कसून चौकशी, आतापर्यंत 35 पेक्षा जास्त लोकांची केली चौकशी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आदित्य चोप्रा यांनी वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये आपले निवेदन नोंदवले
  • यापूर्वी प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित बर्‍याच लोकांची चौकशी करण्यात आली होती

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात, मुंबई पोलिसांनी प्रॉडक्शन हाऊस यशराज फिल्म्सचे मालक आणि निर्माता आदित्य चोप्रा यांचे निवेदन नोंदवले आहे. वृत्तसंस्था एएनआयनुसार वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये त्यांची सुमारे साडेचार तास चौकशी करण्यात आली. मात्र, चोप्रा यांनी आपल्या निवेदनात काय म्हटले आहे, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. 

या प्रकरणार असे आले यशराज यांचे नाव 

  • सुशांतने प्रॉडक्शन हाऊसबरोबर तीन चित्रपट साईन केल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती.  तेव्हा यश राज यांचे नाव या प्रकरणात आले. हे चित्रपट फ्लोरवर येण्यापूर्वीच बंद करण्यात आले होते. 
  • 18 जूनला यशराज फिल्म्सकडून त्यांनी सुशांतसोबत 2012 मध्ये केलेल्या कॉन्ट्रॅक्टची कॉपी मागवण्यात आली होती. 19 जूनला यशराजने निर्देशाचे पालन करत कॉन्ट्रॅक्टची कॉपी पोलिसांना दिली होती.
  • कॉपीमध्ये सुशांतबरोबर यशराजच्या तीन चित्रपटांचा उल्लेख आहे. त्यातील दोन 'शुद्ध देसी रोमांस' आणि 'व्योमकेश बक्षी' हे तयार झाले होते. तिसरा चित्रपट होता 'पानी', तो रिलीज होऊ शकला नाही. कारण हा चित्रपट ओव्हर बजेट होता असले बोलले गेले.
  • 26 जून रोजी यशराज फिल्म्सचे दोन माजी अधिकारी आशिष सिंग आणि आशिष पाटील यांना पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले. सुशांतने 2012 मध्ये सही केलेल्या कराराच्या अटी आणि एक्झिटच्या अटींबद्दल दोघांनाही प्रश्न विचारण्यात आले होते.
  • कारण पोलिसांकडे कराराची प्रत होती. कारण सुशांतला बाहेर काढल्याच्या अॅग्रीमेंटची कोणतीही प्रत पोलिसांकडे उपलब्ध नव्हती.
  • 27 जून रोजी पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने यशराज फिल्म्सचे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांना चौकशीसाठी बोलावले. कारण त्यानेच यशराज चित्रपटासाठी सुशांतला कास्ट केले होते.

आतापर्यंत 35 पेक्षा जास्त लोकांची चौकशी 
सुशांत केसमध्ये मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 35 पेक्षा जास्त लोकांची चौकशी केली आहे. यामध्ये यशराज फिल्म्सचे काही माजी अधिकारी, कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा, सुशांतच्या घरातील स्टाफ, मॅनेजर, पीआर टीम, एक्स मॅनेजर, मित्र, गर्लफ्रेंड, को-स्टार आणि कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. फिल्ममेकर संजय लीला भंन्साली यांचीही चौकशी करण्यात आली आहे. तर शेखर कपूरने आपले वक्तव्य मेल केले आहे. कंगना रनोटलाही चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...