आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. कोर्ट म्हणाले - एक , 'एक प्रतिभावान कलाकार आपल्यातून निघून गेला. असामान्य परिस्थितीत त्याचा मृत्यू झाला. सत्य समोर आलेच पाहिजे.' रियाने सुशांतच्या वडिलांच्या वतीने पाटणा येथे दाखल केलेला खटला मुंबईत हस्तांतरित करण्याची मागणी याचिकेत केली आहे. केस पाटण्याहून मुंबईत ट्रान्सफर करण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने बिहार, महाराष्ट्र सरकार आणि सुशांतच्या वडिलांकडून तीन दिवसांत उत्तर मागितले आहे.
महाराष्ट्र सरकारने कोर्टात म्हटले की, सुशांत प्रकरणाची चौकशी पाटणा पोलिसांच्या अखत्यारीत येत नाही, किंवा तिथे एफआयआरदेखील दाखल होऊ शकत नाही. हे राजकीय प्रकरण बनले आहे. दुसरीकडे सुशांतच्या वडिलांनी सांगितले की, महाराष्ट्र पोलिस पुरावे मिटवत आहेत. सत्य समोर यायला हवे. बिहार पोलिस अधिका-याला क्वारंटाइन करुन चांगला संदेश मिळाला नाहीये, असे कोर्टाने म्हटले आहे.
दरम्यान, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, केंद्र सरकारने बिहार सरकारच्या सीबीआय चौकशीच्या शिफारशीस मान्यता दिली आहे. रियाच्या सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बिहार आणि महाराष्ट्र सरकारने कॅव्हिएट दाखल केली होती.
डीजीपी गुप्तेश्वर पांडेय म्हणाले की, रिया आमच्याशी संपर्कात नाही, ती फरार आहे. ती पुढे येत नाही.े. ती मुंबई पोलिसांच्या संपर्कात आहे की नाही हेदेखील आम्हाला माहित नाही. आम्ही बीएमसीला आमचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाइनमधून मुक्त करण्यास सांगितले आहे. बीएमसीची ही वागणूक व्यावसायिक नाही. अटक केल्याप्रमाणे आमच्या अधिका-याला ठेवले गेले आहे.
सुशांतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या कुटुंबातील 3 सदस्यांसह 2 मॅनेजरविरोधात पाटण्यातील राजीव नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. खंडणी, ब्लॅकमेल, आत्महत्येस प्रवृत्त करणे, छळ करणे असे आरोप त्यांनी केले आहेत. चौकशीसाठी पाटणा पोलिसांनी चार पोलिस अधिका-यांची टीम मुंबईला पाठवली आहे.
डीसीपी परमजीत सिंग दहिया यांनी टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, "हरियाणा पोलिसांचे वरिष्ठ आयपीएस ओपी सिंह जे सुशांतचे भावोजी आहेत, त्यांनी फेब्रुवारीमध्ये सुशांतसोबतचे नाते संपुष्टात आणण्यासाठी रियावर दबाव आणण्यास सांगितले होते. त्यांनी आम्हाला 18 आणि 25 फेब्रुवारी रोजी व्हॉट्सअॅपवर अनौपचारिक विनंती केली होती. मी त्यांना सांगितले होते की, या मार्गाने कोणालाही बोलावून ताब्यात घेतले जाऊ शकत नाही. आपण लेखी तक्रार दिल्यास त्या आधारे तपास केला जाईल.'
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.