आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत मृत्यू प्रकरण:रिया चक्रवर्ती आणि भाऊ शौविकसह इतरांविरुद्ध NCB ने दाखल केले आरोपपत्र, 12 जुलै रोजी होणार सुनावणी

2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा एनसीबी ड्रग्ज अँगलने तपास करत आहे. या प्रकरणात आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि इतरांना आरोपी ठरवले आहे. एनसीबीने विशेष न्यायालयात सर्व आरोपींविरुद्ध आरोप पत्र दाखल केले आहे. या सर्वांवर सुशांत सिंहसाठी ड्रग्ज खरेदी केल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, कारवाईदरम्यान रिया आणि तिचा भाऊ शौविक कोर्टात उपस्थित होते.

12 जुलै रोजी होणार आहे या प्रकरणाची सुनावणी
याप्रकरणी विशेष सरकारी वकील अतुल सरपांडे यांनी सांगितले की, आरोपपत्रात सर्व आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक हे ड्रग्ज घेते होते. त्यांनी सुशांत सिंह राजपूतसाठी ड्रग्ज खरेदी केले होते.

अतुल सपरपांडे पुढे म्हणाले की, न्यायालय सर्वांवर आरोप निश्चित करणार होते, परंतु काही आरोपींनी दोषमुक्तीचे अर्ज दाखल केले असल्याने तसे होऊ शकले नाही. या कारणास्तव न्यायालयाने निर्णय घेतला नाही. दोषमुक्तीच्या अर्जावर निर्णय झाल्यानंतरच आरोपींवर आरोप निश्चित केले जातील, असे न्यायालयाने सांगितले. दुसरीकडे विशेष न्यायाधीश व्हीजी रघुवंशी आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 12जुलै रोजी करणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय करत आहे तपास
सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी मुंबईतील त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. तेव्हापासून या प्रकरणाचा एनसीबीकडून ड्रग्ज अँगलने तपास सुरू करण्यात आला आणि सप्टेंबर 2020 मध्ये रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. जवळपास महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर रियाला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र, अद्यापपर्यंत तपास यंत्रणा कोणत्याही निकालापर्यंत पोहोचलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...