आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत मृत्यू प्रकरण:नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने रियाच्या घरी जाऊन समन्स बजावले, चौकशीसाठी हजर होणार अभिनेत्री; ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीबीआयने रियाची अनेक वेळा चौकशी केली आहे -फाइल फोटो - Divya Marathi
सीबीआयने रियाची अनेक वेळा चौकशी केली आहे -फाइल फोटो
  • ड्रग्स प्रकरणात अटक केलेला सुशांतचा मदतनीस दीपेश सरकारी साक्षीदार बनेल, त्याची प्रक्रिया आज पूर्ण होईल

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रविवारी सकाळी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)ने रिया चक्रवतीच्या घरी जाऊन तिला समन्स बजावला. आज तिची ड्रग्सप्रकरणी चौकशी होऊ शकते. एनसीबी सुशांत केसमध्ये ड्रग्स कनेक्शनचा तपास करत आहे. आतापर्यंत सुशांतचा मदतनीस दीपेश सावंत, अब्दुल बासित, जैद विलात्रा, शोविक चक्रवती (रियाचा भाऊ), सॅम्युअल मिरांडा आणि अब्बास लखानी या 6 जणांना अटक करण्यात आली आहे. कॅजन इब्राहिमला देखील अटक केली होती, मात्र शनिवारी त्याला कोर्टातून जामिन मिळाला.

ड्रग्स प्रकरणात दीपेश सरकारी साक्षीदार बनणार आहे. आज त्याच्या साक्षची प्रक्रिया पूर्ण होईल. एनसीबी शोविकला रियासमोर बसून चौकशी करू शकते.

दरम्यान, एनसीबीने शोविक व मिरांडाला कोर्टात सादर केले. कोर्टाने दोघांना 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबीच्या ताब्यात सोपवले. अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितले की, दीपेश सावंतला समोरासमोर बसवून शोविक व इतरांच्या चौकशीची गरज आहे. रियाच्या अटकेच्या प्रश्नावर एनसीबी अधिकारी म्हणाले, ड्रग्ज रॅकेटमध्ये आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास सुरू आहे. एनसीबीने कैझान इब्राहिमलाही कोर्टापुढे हजर केले. कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser