आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचे सोमवारी रात्री निधन झाले. इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला, पोलिसांकडून दिशाने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दिशाच्या मृत्यूच्या बातमीने सुशांतसह अनेक सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला असून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला श्रद्धांजली वाहिली आहे.
सुशांतने इंस्टाग्रामवर लिहिले की, 'ही अत्यंत दुःखद बातमी आहे. मी दिशाचे कुटुंब आणि मित्रांचे सांत्वन करतो. देव दिशाच्या आत्म्यास शांती देवो.'
नुसरतने दु:ख व्यक्त केले: दिशाच्या मृत्यूची बातमी ऐकून नुसरत भरूचाने इंस्टाग्रामवर लिहिले की, 'ही बातमी ऐकून मी हादरले आहे. दिशा तू निघून गेलीस. मी तिच्या कुटुंबियांचे सांत्वन करते. देव दिशाच्या आत्म्यास शांती देवो', असे नुसरत म्हणाली आहे.
दिशा ही पहिले सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. पण ती आता 'फुकरे' चित्रपटातील अभिनेता वरुण शर्मासाठी काम करत होती. वरुण इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन दिशाला श्रद्धांजली वाहिली आहे. तो म्हणाला, ‘माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत. मला हे खरं वाटत नाही. खूप आठवणी आहेत. ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचे. कामात नेहमी येणाऱ्या अडथळ्यांना ती एकदम सहजपणे सामोरी जायची. तिची खूप आठवण येईल. माझा अजूनही विश्वास बसत नाही की ती आपल्यामध्ये नाही’, असे वरुणने पोस्टमध्ये म्हटले आहे.
अनेक सेलिब्रिटींनी वरुणच्या पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिली. सोनाक्षी सिन्हाने लिहिले, 'RIP'. मौनी रॉय म्हणाली, 'मी अजूनही धक्क्यात आहे. देव दिशाच्या आत्म्याला शांती देवो.' रिचा चड्ढाने लिहिले, 'अतिशय वाईट घटना. हे सत्य नसावे, असे वाटते.'
भारती सिंहने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत दिशाला श्रद्धांजली वाहिली आहे. तिने दिशाचा फोटो शेअर करत त्यावर रडण्याचे इमोजी वापरले आहेत. दिशाने भारतीसाठीही काम केले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.