आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत प्रकरणातील मोठा दावा:मृत्यूच्या काही दिवस आधी सुशांत आणि रिया यांच्यात झाली होती मारहाण, एकमेकांच्या कुटूंबावरुन झाले होते कडाक्याचे भांडण

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका रिपोर्टनुसार, सुशांतच्या मृत्यूची बातमी ऐकूनही रिया त्याच्या फ्लॅटवर गेली नव्हती.
  • रियाच्या वकिलांचा दावा - रियाला सुशांतच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ दिले नव्हते.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सुशांत आणि त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती यांच्याबद्दल एक नवीन खुलासा झाला आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूच्या काही दिवस आधी सुशांतचे रियासोबत कडाक्याचे भांडण झाले होते. या दरम्यान दोघांमध्ये मारहाणदेखील झाली होती. त्यानंतर रियाने सुशांतचे घर सोडले आणि त्याचा नंबर देखील ब्लॉक केला. दोघांमधील भांडण एकमेकांच्या कुटूंबावरुन झाल्याचे सांगण्यात येत आहे.

  • यापूर्वीही पोलिस रिया-सुशांतच्या नात्याबद्दल बोलले होते

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिस आयुक्तांनी रिया आणि सुशांतच्या नात्याबद्दल मीडियाला सांगितले होते. त्यांनी सांगितल्यानुसार, 8 जून रोजी रिया सुशांतचे घर सोडून गेली होती. कारण ती स्वत: नैराश्यात होती आणि तिची मानसिक स्थितीही ठीक नव्हती. आयुक्तांनी सांगितल्यानुसार, रियाची दोनदा चौकशी केली असता सुशांत सोबतच्या नात्यात अडचणी असल्याचे समोर आले. रियाने पोलिसांना सुशांतच्या मानसिक आजाराबद्दल सांगितले आणि त्याचे प्रिस्क्रिप्शनही दिले.

  • 8 जूननंतर रिया-सुशांत यांच्यात बोलणे झाले नव्हते

अलीकडेच सुशांत सिंह राजपूतचे कॉल डिटेल रेकॉर्ड समोर आले. यानुसार 8 जून ते 14 जून या काळात सुशांतचे रियाशी एकदाही बोलणे झाले नव्हते. या दोघांमध्ये मेसेजची देवाणघेवाणही झाली नाही. सुशांतने 8 ते 14 जून दरम्यान केवळ दोनच कॉल केले. दोन्ही कॉल त्याने त्याच्या बहिणींना केले होते. त्याच वेळी, या कालावधीत त्याचे एकूण 9 इनकमिंग कॉल होते.

  • रिया सुशांतच्या बहिणीला बोलावून निघून गेली होती

सुशांतची बहीण मीतूनेही सुमारे 10 दिवसांपूर्वी बिहार पोलिसांच्या चौकशीदरम्यान सुशांत आणि रिया यांच्यातील भांडणाबद्दल सांगितले होते. मीतूने सांगितले होते की, 8 जून रोजी रियाने तिला फोन करून सुशांतशी भांडण झाल्याचे सांगितले. त्यानंतर ती सुशांतला त्याच्या वांद्रे घरी भेटायला गेली आणि काही दिवस त्याच्याबरोबर राहिली.

सुशांतनेदेखील मीतूला सांगितले होते की, रियाशी त्याचे भांडण झाले आणि त्यानंतर ती घर सोडून निघून गेली. यादरम्यान रियाने सुशांतचा काही सामान तिच्यासोबत नेले. घर सोडून निघून जाताना कदाचित आता परतणार नाही, असे रिया म्हणाली होती. मीतूच्या म्हणण्यानुसार ती 8 ते 12 जून दरम्यान सुशांतसोबत राहिली. परंतु मुले लहान असल्याने ती 12 जून रोजी आपल्या घरी परतली.

  • सुशांतच्या मृत्यूनंतरही रिया त्याच्या फ्लॅटवर गेली नव्हती

14 जून रोजी दुपारी सुशांत सिंह राजपूतने त्याच्या वांद्रेस्थित फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पण बातमी मिळताच रिया तिथे पोहोचली नाही. इतकेच नव्हे तर एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार रियाने सुशांतच्या कुटूंबातील सदस्याला फोन लावला नाही किंवा आपल्या घरातील कर्मचार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, दुसर्‍या दिवशी ती कूपर रुग्णालयात पोहोचली, जिथे सुशांतच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम झाले.

  • रिया सुशांतच्या अंत्यसंस्कारापासून दूर ठेवले गेले

अलीकडेच रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी खुलासा केला होता की, रियाला सुशांतच्या अंत्यसंस्कारात भाग घेण्याची परवानगी नव्हती. त्यांनी सांगितल्यानुसार, कोरोनामुळे 20 लोकांना अंत्यसंस्कारामध्ये जाण्याची परवानगी होती. पण या यादीतून रियाचे नाव काढून टाकण्यात आले होते. यापूर्वी सुशांतच्या कुटुंबीयांना रिया पसंत नव्हती अशा बर्‍याच बातम्या आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...