आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Sushant Singh Rajput And Sara Ali Khan Would Stay At The Farmhouse For Three To Four Days Whenever They Go, Actor Was In Planning To Propose To Actress

सारा अली खानला प्रपोज करणार होता सुशांत:फार्महाऊसच्या केअर टेकरचा खुलासा - सारा कायम सुशांतसोबत फार्महाऊसवर येत असे, दोन-तीन दिवस तिथेच थांबायची

मुंबई2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 सुशांतला त्याच्या वाढदिवशी म्हणजे 21 जानेवारी 2019 रोजी साराला प्रपोज करायचे होते.
 • रईस हा सप्टेंब 2018 पासून सुशांतच्या फार्महाऊसवर केअर टेकर म्हणून काम करत होता.
 • मार्च 2020 मध्ये सुशांत दोन-तीन महिन्यांसाठी फार्महाऊसवर येणार होता, मात्र तो आला नाही.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या फार्महाऊसची देखभाल करणा-या रईसने सांगितल्यानुसार, सुशांत अभिनेत्री सारा अली खान हिला प्रपोज करणार होता. केदारनाथ या चित्रपटात सारा आणि सुशांत एकत्र दिसले होते. अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्याची चर्चा होती. एका वृत्तसंस्थेशी बोलताना रईस म्हणाला की, सुशांत सर सारा मॅडमला प्रपोज करणार होते. त्या कायम सरांसोबत फार्महाऊसवर यायच्या.

 • जेव्हा कधी फार्महाऊसवर यायचे तिथे तीन ते चार दिवस थांबायचे

रईस सप्टेंबर 2018 पासून ते सुशांतच्या मृत्यूपर्यंत लोणावळा येथील फार्महाऊसवर केअर टेकर म्हणून काम करत होता. आयएएनएसशी बोलताना त्याने सांगितले की, 2018 पासून सारा मॅडमनी सुशांत सरांसोबत फार्महाऊसवर यायला सुरुवात केली होती. जेव्हा त्या यायच्या तेव्हा तीन ते चार दिवस तेथे मुक्काम करायच्या. डिसेंबर 2018 मध्ये थायलंड ट्रिपहून परतल्यानंतर हे दोघे विमानतळावरुन थेट फार्महाऊसवर आले होते. रात्री 10 ते 11च्या दरम्यान दोघे पोहोचले होते. आले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र देखील होते’

 • मोलकरणीला मावशी आणि रईसला भाई म्हणायची सारा

रईसने पुढे सांगितले, ‘सारा मॅडम खूप चांगल्या पद्धतीने वागल्या होत्या. त्या अभिनेत्री असल्यासारख्या वागत नव्हत्या. त्या खूप साध्या आहेत. सुशांत प्रमाणेच त्यांनी देखील फार्महाऊसवर काम करणाऱ्या बाईला मावशी आणि मला रईस भाई असा आवाज दिला. सुशांत सरांच्या कर्मचार्‍यांबद्दल त्यांना खूप आदर होता.’

 • पंतप्रधानांच्या दौ-यामुळे दमण ट्रीप रद्द झाली होती

रईस पुढे म्हणाला, ‘मला आठवतेय की अब्बास भाई (सुशांतचा मित्र) यांनी जानेवारी 2019 मध्ये सुशांत सरांच्या वाढदिवशी दमण ट्रिपला जाण्यासाठी तयारी करण्यास सांगितले होते. सुशांत सरांची बॅग पॅक करण्याची जबाबदारी कायम माझी असायची. त्यात दुर्बिण, म्युझिक सिस्टम आणि गिटार या वस्तू ते सोबत नेत असतं. आम्ही मिनी टेम्पोत हे सामान घेऊन जायचो. मात्र फेब्रुवारीच्या जवळपास दमणमध्ये पंतप्रधानांचा दौरा होता. त्यामुळे तेथील सर्व हॉटेल फूल होते आणि आम्हाला हॉटेलची रुम मिळाली नाही. त्यामुळे ती ट्रिप रद्द झाली.'

 • वाढदिवशी साराला प्रपोज करणार होता सुशांत

रईसने पुढे सागितल्यानुसार, 'सुशांत सर दमण ट्रिपच्यावेळी साराला प्रपोज करण्याचा विचार करत होते. त्यांना सराला गिफ्ट द्यायचे होते आणि त्यांनी तिच्यासाठी काही तरी ऑर्डरपण केले होते. पण ट्रिप रद्द झाली. त्यानंतर केरळला जाण्यासाठी ट्रिप आयोजित केली. पण ती देखील रद्द झाली. नंतर 2019 च्या फेब्रुवारी-मार्च दरम्यान दोघांचे ब्रेकअप झाल्याचे मी ऐकले. सारा मॅडम जानेवारी 2019 नंतर फार्महाऊसवर आल्या नाहीत.'

 • यावर्षी दोन ते तीन महिन्यांसाठी फार्महाऊसवर जाणार होता सुशांत

रईसने सांगितल्यानुसार, मार्च -2020 मध्ये सुशांत त्याच्या फार्महाऊसवर दोन ते तीन महिने मुक्काम करणार होता. पण तो तेथे आला नाही. रईल म्हणाला, "ते फार्महाऊसमध्ये सेंद्रिय शेतीची तयारी करत होते. त्यांनी मला सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत यांच्यामार्फत एक यादी पाठवली होती. ज्यात फार्महाऊसमध्ये राहण्याचे आणि शेतीसाठी काय आवश्यक आहे याबद्दल लिहिलेले होते. मुंबईहून किराण्याचे साहित्यदेखील फार्महाऊसवर पाठवण्यात आले होते. मला तारीख नीट आठवत नाही. पण 15 किंवा 17 मार्च रोजी सकाळी 6 वाजता सुशांत सर मुंबईहून फार्महाऊसकडे निघणार होते. त्यानंतर अचानक त्यांची योजना रद्द झाली आणि ते येऊ शकले नाहीत."