आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sushant Singh Rajput Bank Account (ED) Update | Enforcement Directorate Found No Evidence Of Money Laundering In Sushant's Bank Accounts

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत प्रकरणात नवा दावा:ईडीला सुशांतच्या बँक खात्यातून मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे मिळाले नाहीत, तपास यंत्रणेने म्हटले - कुटुंबीयांनी गैरसमजातून आरोप केले

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतच्या खात्यातून 15 कोटींचा घोळ झाल्याचा वडील केके सिंह यांनी आरोप केला होता

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणात अनेक दावे चुकीचे असल्याचे सिद्ध होत आहे. आधी एम्स पॅनलने हत्येची शक्यता फेटाळून लावली. आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुशांतच्या बँक खात्यातून मनी लॉन्ड्रिंगचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे म्हटले आहे. या अहवालात ईडी सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की सुशांतच्या कुटुंबीयांकडून गैरसमजांमुळे हे आरोप करण्यात आले होते.

सुशांतच्या आर्थिक बाबतीत कुटुंबाला माहिती नव्हती

मुंबई मिरर रिपोर्ट्सनुसार, ईडीच्या सुत्रांनी सांगितले की, सुशांतच्या कुटुंबियांना त्याच्या आर्थिक व्यवहाराविषयी काहीही कल्पना नव्हती. यामुळेच त्याच्या मृत्यूनंतर त्यांना त्याच्या खात्यांमधून मोठ्या प्रमाणात पैशाचा गैरव्यवहार झाल्याचा संशय आला होता.

ईडीला सुशांतच्या खात्यातून मनी लॉन्ड्रिंग किंवा इतर संशयित व्यवहार केल्याचे पुरावे मिळाले नाहीत. दरम्यान बँक खात्यातून झालेल्या छोट्या-मोठ्या व्यवहाराची तपासणी केली जात आहे. जेणेकरून हे व्यवहार का आणि कोणाला केले याबाबत माहिती मिळेल.

सुमारे 2.78 कोटी रुपये टॅक्स भरला

रिपोर्टनुसार ईडीला तपासणी दरम्यान आढळून आले की सुशांतच्या बँक खात्यातून 2.78 कोटी रुपये कर (जीएसटीसह) देण्यात आले आहेत. काही लहान रक्कम अद्याप गहाळ आहे, शोध संस्था शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान रिया चक्रवर्तींच्या खात्यात सुशांतच्या खात्यातून कोणत्याही मोठ्या रकमेचा थेट व्यवहार झालेला नसल्याचेही ईडीच्या सूत्रांनी सांगितले. या दोघांमध्ये लहान-सहान व्यवहार झाले असतील असे तपास करणाऱ्यांचे म्हणणे आहे.

कुटुंब व्यवहारात दखल देत नव्हते

सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी असेही म्हटले आहे की, अभिनेत्याच्या आर्थिक व्यवहाराबाबत कुटुंबाला काहीच कल्पना नव्हती. कुटुंबाने त्याच्या आर्थिक बाबतीत कधीही हस्तक्षेप केला नाही किंवा त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला नाही. ईडीचा तपास सुरू आहे. हा तपास पूर्ण झाल्यानंतरच फाइंडिंग समोर येईल. आम्ही आमची चिंता तपास यंत्रणेला कळविली आहे आणि त्याचा (सुशांत) निधी काही आरोपींकडे गेला आहे का याची चौकशी करण्यास सांगितले. त्याचा चार्टर्ड अकाउंटंट बदलला होता.

31 जुलै रोजी ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता

सुशांतसिंग राजपूतचे वडील केके सिंह यांनी पटना येथे दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे 31 जुलै रोजी ईडीने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, वडील इंद्रजित, आई संध्या, सुशांतचे घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा आणि व्यवस्थापक श्रुती मोदी यांच्याविरूद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.

या सर्व आरोपींनी सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटींचा गोंधळ केल्याचा आरोप केके सिंह यांनी केला होता. ईडीने या प्रकरणातील सुमारे 24 जणांची चौकशी केली आहे, त्यामध्ये सुशांतचे माजी कर्मचारी आणि मुख्य आरोपींसह माजी टॅलेंट मॅनेजर यांचा समावेश आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser