आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला एकीकडे एम्सच्या फॉरेन्सिक टीमने आत्महत्येचे प्रकरण म्हटले आहे. तर दुसरीकडे, त्याच्या बँक खात्याच्या फॉरेन्सिक ऑडिट अहवालातदेखील संशयास्पद पुरावे सापडलेले नाहीत. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सुशांतच्या सर्व बँक खात्यांमधून गेल्या पाच वर्षांत 70 कोटींचा व्यवहार झाला होता, त्यापैकी केवळ 55 लाख रुपये रिया चक्रवर्तीशी संबंधित असल्याचे आढळले आहे. यातील बहुतेक खर्च प्रवास, स्पा आणि भेटवस्तू खरेदीवर करण्यात आला होता.
सीबीआय आता या अँगलने या प्रकरणाची चौकशी करेल
आत्महत्येचे प्रकरण स्पष्ट झाल्यानंतर सीबीआय आता त्याच्या आत्महत्येमागील कारणांची चौकशी करेल. यामध्ये रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाची भूमिका, व्यावसायिक प्रतिस्पर्धी आणि बॉलिवूडमधील घराणेशाही, अमली पदार्थांचा दुरुपयोग आणि सुशांतच्या मानसिक आरोग्य यासंदर्भात आता सीबीआय तपास करणार आहे.
सुशांतच्या वडिलांनी 15 कोटींच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल केला
सुशांतचे वडील केके सिंह यांनी ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या रिया चक्रवर्तीविरूद्ध 15 कोटी रुपयांच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. याला आधार म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात रियाची तीनदा चौकशी करण्यात आली. अद्याप ईडीने आपला अंतिम अहवाल सार्वजनिक केला नाही. या प्रकरणाच्या तपासादरम्यान सुशांतच्या बँक खात्याचे फॉरेन्सिक ऑडिट झाले.
हे पैसे सुशांतच्या परवानगीने खर्च केले गेले
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रिपोर्ट सीबीआयलाही शेअर करण्यात आला आहे. रियाने सुशांतचे पैसे स्वत:साठी किंवा आपल्या कुटुंबासाठी खात्यातून काढल्याचे सिद्ध झालेले नाही. बहुतेक पैसा सुशांतच्या इच्छेनुसार किंवा त्याच्या परवानगीने खर्च करण्यात आला होता. खर्च झालेले पैसे सुशांतच्या एकूण उत्पन्नापेक्षा बरेच कमी आहेत. तथापि, खात्याशी संबंधित अन्य माहिती सार्वजनिक करणे बाकी आहे.
सीबीआयने आतापर्यंत दोन डझनहून अधिक लोकांची चौकशी केली
सीबीआयने या प्रकरणात दोन डझनहून अधिक लोकांची चौकशी केली आहे. यामध्ये रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्य, सुशांत सिंह राजपूतचे नातेवाईक, त्याचे कर्मचारी आणि हाऊस मॅनेजर, ज्या बँकांमध्ये त्याची खाती होती अशा बँकांचे कर्मचारी, त्याचे डॉक्टर आणि काही मित्र आणि ओळखीच्या लोकांचा समावेश होता. सुशांत सुट्टीवर गेलेल्या पावना डॅम रिसॉर्टच्या कर्मचार्यांचीही एजन्सीने चौकशी केली आहे.
रिपोर्टमध्ये तारखेनुसार झालेल्या व्यवहाराची माहिती देण्यात आली आहे
कोटक महिंद्रा बँकेतून सुशांतच्या खात्यासंदर्भातील जी कागदपत्रे आली आहेत, त्यात 2019 मधील 14 आणि 22 जुलै, त्यानंतर 2, 8 आणि 15 ऑगस्ट रोजी सुशांतच्या कार्डद्वारे पूजापाठ साहित्याच्या खरेदीसाठी खर्च करण्यात आला. 15 ऑगस्ट रोजी अशा कामासाठी पैसे काढले गेले नाहीत. अहवालात तारखेनुसार झालेल्या व्यवहाराची माहिती देण्यात आली आहे. जी खालीलप्रमाणे आहे…
90 दिवसांत झाला 3.24 कोटी रुपयांचा व्यवहार
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.