आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा आज वाढदिवस आहे. तो आज हयात असता तर त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण केली असती. सुशांतच्या वाढदिवसाच्या दिवशी कंगना रनोटने पुन्हा एका घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून यशराज फिल्म्स, करण जोहर आणि महेश भट्ट यांच्या नावांचा उल्लेख करत या सर्वांनी मिळून सुशांतचा खून केला, असा गंभीर आरोप केला आहे.
'मूव्ही माफियांना त्रास दिला'
कंगनाने सोशल मीडिया अकाऊंटवर सुशांत चे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने, ‘प्रिय सुशांत, मूव्ही माफियांनी तुला त्रास दिला, तू सोशल मीडियावर अनेकदा मदतीसाठी विनंती केलीस पण मी तुझी मदत करु शकले नाही याचे मला दु:ख होते. तू या मूव्ही माफियांचे टॉर्चर सहन करण्यास सक्षम आहेस असे मी गृहीत धरायला नको होते,’ असे कंगना म्हणाली आहे.
कंगना इथेच थांबली नाही. तिने पुढच्या पोस्टमध्ये लिहिले, "मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी सुशांतने सोशल मीडियावर लिहिले होते की, मूव्ही माफिया त्याला फिल्म इंडस्ट्रीतून काढू इच्छितात, हे आपण विसरायला नको. त्याने आपल्या चाहत्यांना त्याचा चित्रपट यशस्वी करण्यासाठी मदत मागितली होती. मुलाखतींमध्ये तो घराणेशाहीवर व्यक्त झाला होता. त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना फ्लॉप म्हटले गेले होते," असे कंगना म्हणाली.
कंगना पुढे लिहिते, "सुशांतने यशराज फिल्म्सने त्याच्यावर बंदी घालणार असल्याचे सांगितले होते. करण जोहरने त्याला मोठी स्वप्ने दाखवली आणि नंतर त्याचा चित्रपट ओटीटीवर रिलीज करुन सुशांत फ्लॉप अभिनेता असल्याचे करणने कसे रडगाणे गायले होते, हेदेखील विसरू नका."
कंगनाने महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधताना म्हटले, "महेश भट्ट यांची सर्व मुले नैराश्यात आहेत, तरीही त्यांनी सुशांतला त्याची अवस्था परवीन बाबीप्रमाणे होणार, असे म्हटले होते. या सर्वांनी मिळून सुशांतला ठार केले आणि मृत्यूपूर्वी सुशांतने स्वतः सोशल मीडियावर हे सर्व लिहिले होते," असे कंगनाने सांगितले.
सोशल मीडियावर कंगनाच्या या सर्व पोस्ट व्हायरल झाल्या असून अनेकांनी कमेंट करत तिला पाठिंबा दिला तर काहींनी तिला ट्रोल केले आहे.
14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला होता. त्यांच्या मृत्यूबद्दल कंगना रनोटने करण जोहर कॅम्पवर हल्ला बोल केला होता. दैनिक भास्करशी खास संभाषणात ती म्हणाली होती की, सुशांतने टोकाचे पाऊल उचलून घराणेशाही, फिल्म माफिया आणि कंपूशाहीला प्रोत्साहन देणा-या लोकांना विजय मिळवून दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.