आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पाटणा:सुशांत सिंह राजपूतचा भाऊ म्हणाला- रिया चक्रवर्तीला अटक करुन पोलिसांनी करावी चौकशी, सत्य येईल समोर

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुशांत सिंह राजपूतचा चुलत भाऊ आणि आमदार नीरज कुमार बबलू.
  • रियाने सुशांतची फसवणूक केली, तिने त्याच्या बँक खात्यातून पैसे काढले
  • रियाच्या अटकेनंतर सर्व सत्य समोर येईल

पोलिसांनी रिया चक्रवर्तीला अटक करुन तिची चौकशी करावी अशी मागणी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा चुलत भाऊ आणि आमदार नीरज कुमार बबलू यांनी केली आहे. त्यानंतरच सत्य समोर येईल, असे ते म्हणाले आहेत. एफआयआ मध्ये लावण्यात आलेल्या सर्व आरोपांची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. रिया चक्रवर्तीवरील सर्व आरोप खरे आहेत. तिने सुशांतची फसवणूक केली आहे. त्याच्या खात्यातून पैसे काढले, असे त्यांनी म्हटले आहे.

पाटणा पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुंबई पोलिसांनी मदत करावी अशी आमची इच्छा आहे. चौकशीनंतर कारवाई झाली पाहिजे. आम्हाला यावर त्वरित कारवाईची अपेक्षा आहे. जे काही आरोप झाले आहेत, त्यावर कारवाई झाली पाहिजे. खात्यातून पैसे काढून घेण्यात आले ही वस्तुस्थिती आहे हे बँक तपशिलांमध्ये उघड आहे. हा कागदोपत्री पुरावा आहे, असे नीरज कुमार म्हणाले आहेत. रियाला अटक झाल्यानंतर सर्व गोष्टी उघड होती आणि सत्य समोर येईल, असेही ते म्हणाले आहेत.