आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरमजीत सिंग दहिया यांनी सोशल मीडियावर व्हॉट्सअॅपचे काही स्क्रीन शॉट्स शेअर केले आहेत. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास अधिकाधिक गुंतागुंतीचा होत आहे. या प्रकरणी दर दिवशी नवनवीन खुलासे होत आहेत. आता त्यांनी मुंबई पोलिसांसोबतच्या संभाषणाचे स्क्रिनशॉटही शेअर केले आहेत. आता मुंबई पोलिस उपायुक्त परमजीत सिंग दहिया यांनी दावा केला आहे की, सुशांत सिंह राजपूतचे भावोजी आणि आयपीएस ओपी सिंह यांनी रिया चक्रवर्तीवर सुशांतला सोडून जाण्यासाठी पोलिसांकडून दबाव आणण्यास सांगितले होते. त्यांच्याकडून काही व्हॉट्सअॅपचे स्क्रीन शॉट्स सोशल मीडियावरही शेअर केले गेले आहेत.
दहिया यांनी एका टीव्ही चॅनेलला सांगितले की, सुशांतचे भावोजी आणि हरियाणाचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी ओ.पी. सिंह यांनी त्यांना ही विनंती यावर्षी फेब्रुवारीमध्ये केली होती. डीसीपी दाहिया यांनी शेअर केलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजवरुन सुशांतचे भावोजी त्याला टॅक्सी बुक करण्यासाठी आणि हॉटेलची रुम बुक करण्यास सांगायचे, हेही समोर आले आहे.
दहिया म्हणाले की, "सिंह यांनी मला रिया चक्रवर्तीला अनौपचारिक पद्धतीने पोलिस ठाण्यात बोलावण्यासाठी आणि तिच्यावर दबाव आणण्यास सांगितले होते." दहिया 1 एप्रिलपर्यंत वांद्रेचे विभागीय पोलिस प्रमुख होते.
दहिया म्हणाले की, सिंहने यांनी त्यांना सांगितले होते की, सुशांतच्या कुटुंबीयांना रिया त्याला नियंत्रणात ठेवत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे ते रियाला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढू इच्छितात. आयपीएस दहिया म्हणाले की, ओ.पी. सिंग यांनी ही विनंती अनौपचारिकरित्या 18 आणि 25 फेब्रुवारी रोजी व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून केली होती. सुशांतच्या कुटुंबीयांनी त्यावेळी यासंदर्भात कोणतीही लेखी तक्रार केली नसल्याचे दहिया यांनी स्पष्ट केले.
डीसीपी दहिया म्हणाले की, ओपी सिंह हे 5 फेब्रुवारीला मुंबई आले होते आणि सुशांत राजपूतला ते मुंबईत असल्याची माहिती देण्यास सांगितले. त्यांनी मिरांडा नावाच्या व्यक्तीला कोणतीही तक्रार किंवा चौकशी न करता पोलिस कोठडीत ठेवण्याची विनंतीही केली होती.
डीसीपींनी सांगितल्यानुसार, त्यांनी सिंह यांना स्पष्ट केले होते की, पोलिस ठाण्यात एखाद्याला बोलवणे आणि कस्टडीत ठेवणे हे कार्यपद्धतीच्या विरुद्ध आहे. दहिया यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून सिंह यांना तक्रार दाखल करण्यास सांगितले होते. यासंदर्भात कोणतीही लेखी तक्रार केली नसल्याचे ते म्हणाले.
सुशांत राजपूत यांचे वडील के. के. एक व्हिडिओ प्रसिद्ध करताना सिंह म्हणाले होते की, त्यांनी 25 फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिसांना आपल्या मुलाच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते.
मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी सोमवारी सांगितले की, चौकशीदरम्यान कुटुंबाने कोणतीही शंका व्यक्त केली नव्हती. शहर पोलिसांनी 16 जून रोजी कुटुंबाचे जबाब नोंदवले होते. ते म्हणाले, "त्यांनी त्यावेळी कोणतीही शंका व्यक्त केली नव्हती आणि तपासात हलगर्जीपणाची कोणतीही तक्रार केली नव्हती."
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.