आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:सुशांतच्या वडिलांच्या आरोपांचे सीएने केले खंडन, बँकेचा तपशील शेअर करत म्हणाले - सुशांतच्या खात्यातून रियाकडे कोणतीही मोठी रक्कम ट्रान्सफर झाली नाही

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत सिंह राजपूतचे सीए संदीप श्रीधर यांच्या म्हणण्यानुसार, सुशांतच्या बँक खात्यात एवढी मोठी रक्कम नव्हती, ज्याचा दावा त्याचे कुटुंबीय करत आहेत.
  • वडिलांनी आरोप केला आहे की, सुशांतच्या खात्यात 17 कोटी रुपये होते, त्यापैकी 15 कोटी अशा खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले, ज्यांच्याशी त्याचा काही संबंध नव्हता.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवा वळण येत आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर त्याच्या बँक खात्यातून 15 कोटी रुपये काढल्याचा आरोप केला आहे. मात्र सुशांतचे सीए संदीप श्रीधर यांनी त्यांच्या या आरोपाचे खंडन केले असून, सुशांतच्या अकाउंटमध्ये एवढी मोठी रक्कम नसल्याचा दावा केला आहे.

  • रियाच्या बँक खात्यात कोणतीही मोठी रक्कम ट्रान्सफर झाली नाही

संदीप एका वर्षापासून सुशांतचे सीए होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, रिया किंवा तिच्या कुटुंबीताली कुठल्याही व्यक्तीच्या खात्यात सुशांतच्या अकाउंटमधून एक लाख रुपयेदेखील ट्रान्सफर झालेले नाहीत. इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी सांगितले की, "रियाच्या खात्यावर काही हजार सोडले तर कोणतीही मोठी रक्कम ट्रान्सफर झाली नाही. एकदा रियाच्या आईने (सुशांतला) 33 हजार रुपये ट्रान्सफर केले होते. सुशांत एक फिल्म स्टार होता, त्यामुळे त्याला आपली लाइफस्टाइल आणि खर्चे मेंटेन करावे लागायचे. दोघेही (सुशांत आणि रिया) एकत्र प्रवास करायचे आणि सुशांत त्याच्या इच्छेनुसार राहायचा', असे श्रीधर यांनी सांगितले आहे.

  • सुशांतचे शॉपिंग, भाडे आणि आणि प्रवास असे खर्च होते

संदीप श्रीधर पुढे म्हणाले, "सुशांत शॉपिंग, भाडे आणि एकत्र प्रवास करण्यासारख्या इतर गोष्टींवर खर्च करायचे. त्याचे एकूण एवढे नव्हते, ज्याचा दावा केला जातोय. गेल्या वर्षभरात त्याची कमाई कमी झाली होती", असे त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त, संदीप यांनी सुशांतच्या खात्यातून झालेल्या व्यवहारांची लिस्टही शेअर केली आहे: -

खर्चरक्कम
जीएसटी + प्राप्तिकर (जानेवारी 2019 ते जून 2020)

2.7 कोटी रुपये
क्वान (टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी) चे देणे61 लाख रुपये
कोटक महिंद्रामध्ये टर्म डिपॉझिट2 कोटी रुपये
भाडे60 लाख रुपये
इस्टेट एजंटचे देणे
3.87 लाख रुपये
लोणावळा फार्महाऊसचे भाडे26.40 लाख रुपये
जो प्रवास दोघांनी एकत्र केला, त्याचा खर्च4.87 लाख रुपये
परदेश दौरा50 लाख रुपये
आसाम ते केरळ टूर2.5 कोटी रुपये
  • काय आहेत सुशांतच्या वडिलांचे आरोप?

26 जून रोजी रियाविरोधात सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. सुशांतचे वडील के.के सिंह यांच्या तक्रारीवरुन रियासह तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती आणि दोन व्यवस्थापक सौमिल चक्रवर्ती आणि श्रुती मोदी यांच्याविरोधात पाटण्यातील राजीव नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रिया चक्रवर्तीविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, फसवणूकीसह विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर या आरोपांसह पैसे उकळल्याचा आरोपही केला आहे. पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात त्यांनी सांगितले की, "माझ्या मुलाच्या बँक खात्याच्या स्टेटमेंटवरुन गेल्या एका वर्षात त्यातून सुमारे 15 कोटी रुपये काढले गेल्याचे मला समजले आहे. ज्या ठिकाणी पैसे ट्रान्सफर केले गेले त्या ठिकाणी माझ्या मुलाचा काही संबंध नव्हता. रियाने आपल्या कुटुंबीय व सहकार्‍यांसह मिळून माझ्या मुलाच्या बँक खात्यातून आणि क्रेडिट कार्डातून किती पैसे काढले? याची सखोल चौकशी व्हावी', असे ते म्हणाले आहेत.