आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आता दोन वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे. पण आजही त्याच्या आठवणींनी चाहते भावूक होतात. अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सुशांतच्या आवडत्या कारचाआहे. ती कार सध्या सुशांतच्या मुळ गावी त्याच्या घराच्या अंगणात उभी आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते पुन्हा एकदा खूप भावूक झाले आहेत.
'4747' होता सुशांतचा लकी नंबर
इन्सेंट बॉलिवूडने अलीकडेच त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात सुशांतची रेंज रोव्हर कार दिसतेय. सुशांतला गाड्यांची खूप आवड होती. आपल्या मेहनतीच्या कमाईतून त्याने पांढऱ्या रंगाची रेंज रोव्हर कार खरेदी केली होती.
सुशांतच्या कारचा नंबर 4747 आहे, सध्या त्याची लाडकी कार त्याच्या पाटण्यातील घराच्या पार्कींग एरियामध्ये उभी आहे, तसेच त्या ठिकाणी अभिनेत्याचा फोटो कारच्या समोर टेबलवर ठेवण्यात आला आहे. सुशांतच्या स्मरणार्थ अभिनेत्याच्या कुटुंबियांनी ही कार हॉलमध्ये उभी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
चाहत्यांनी केले सुशांतचे स्मरण
सुशांतच्या कारच्या या व्हिडिओवर चाहते भरभरून कमेंट करत आहेत. यासोबतच सोशल मीडियावर पुन्हा एकदा जस्टीस फॉर सुशांतसिंह राजपूत हा हॅशटॅग ट्रेंडिंगला आला. एका युजरने लिहिले की, 'सुशांतनंतर माझ्यासाठी बॉलिवूड संपले आहे.'
काही चाहत्यांनी लिहिले की, 'अजूनही विश्वास बसत नाही की तो आपल्यात नाही, पण तो आमच्या मनात कायम जिवंत राहील.'
14 जून 2020 रोजी मृतावस्थेत आढळला होता सुशांत
सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी वांद्रास्थित राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आला होता. सुरुवातीला सुशांतने आत्महत्या केल्याची चर्चा होती. पण नंतर सुशांतची आत्महत्या नसून ती हत्याच असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. अभिनेत्याच्या कुटुंबियांनीसुद्धा सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. पण सीबीआयने आपल्या अहवालात सुशांतने आत्महत्या केल्याचे सांगितले.
सीबीआयचा तपास सुरु असताना यात ड्रग्ज कनेक्शनही समोर आले होते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने या प्रकरणाची तपासणी केली होती. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाला पोलिसांनी अटक केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.