आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली कृतज्ञता:सीबीआयकडे तपास गेल्यानंतर कुटुंबीय म्हणाले - आम्हाला विश्वास आहे की दोषींना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा नक्की होईल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 25 जुलै रोजी सुशांतच्या कुटुंबीयांनी पाटण्यात रिया चक्रवर्तीसह सहा जणांविरोधात एफआयआर दाखल केला होता.
  • नितीशकुमार सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.

सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात यावी, यासाठी त्याचे कुटुंबीय आणि चाहते मागील एक महिन्यांपासून प्रतिक्षेत होते. अखेर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे सांगितले. यासाठी देश-विदेशात डिजिटल मोहीम राबविण्यात आली. 19 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आणि तपास सीबीआयकडे सोपविला. यानंतर सुशांतच्या कुटुंबीयांनी थँक्स गिव्हिंग नोट जारी केली आहे.

  • चाहत्यांना म्हटले एक्सटेंडेट फॅमिली

सुशांतची भाची मल्लिका सिंहने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही नोट लिहिली आहे. या नोटमध्ये लिहिले आहे, ''सुशांतचे कुटुंब, मित्र, हितचिंतक, मीडिया आणि जगभरातील त्याच्या लाखो चाहत्यांचे मनापासून आभार. सुशांतवर असलेल्या तुमच्या प्रेमाबद्दल आणि आमच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल तुमचे आभारी आहोत. आम्ही विशेषत: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे आभार मानतो. त्यांनी थांबलेल्या न्याय प्रक्रियेस वेग दिला. आता जेव्हा देशातील सर्वात विश्वासार्ह तपास यंत्रणेने पदभार स्वीकारला आहे, तेव्हा आम्हाला विश्वास आहे की दोषींना त्यांच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा होईल. आमचा विश्वास आहे की, संस्थांवर लोकांचा विश्वास कायम राहिला पाहिजे. आजच्या घडामोडींमुळे लोकशाहीवरील आमचा विश्वास दृढ झाला आहे. आमचे देशावरील प्रेम अटूट आहे. आज ते आणखी मजबूत झाले आहे. आमच्या विस्तारित कुटुंबाचे आभार.''

  • कुटुंबीयांनी बनवले ट्विटर हँडल

सोशल कॅम्पेनद्वारे सुशांतसाठी न्यायाची मागणी करण्यासाठी त्याच्या कुटुंबाने युनायटेड फॉर जस्टिस नावाचे ट्विटर हँडलही तयार केले आहे. हे अकाउंट ऑगस्ट 2020 मध्ये तयार केले गेले. ज्याला आतापर्यंत 11 हजारांहून अधिक लोकांनी फॉलो केले आहे. सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्ती आणि भाची मल्लिका सिंहसुद्धा सोशल मीडियावर या प्रकरणाविषयी प्रचार करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...