आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत प्रकरणात मोठी कारवाई:नारकोटिक्स ब्यूरोकडून ड्रग पॅडलर कैजान इब्राहिमला अटक, रियाचा भाऊ शोविक आणि सुशांतचा हाउस मॅनेजर सॅमुअलची चौकशी सुरू

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनसीबीने आतापर्यंत 5 जणांना अटक केली, यांनी रिया, शोविक आणि मिरांडाशी संबंध असल्याचे मान्य केले

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ने शुक्रवारी कैजान इब्राहिमला अटक केले आहे. कैजान ड्रग पॅडलर असल्याची माहिती आहे. तिकडे, रिया चक्रवर्ती आणि सुशांतचा हाउस मॅनेजर सॅमुअल मिरांडाच्या घरी छापेमारी करण्यात आली. दोघांच्या घराची अडीच तास झडती घेण्यात आली. रियाच्या घरी भाउ शोविक चक्रवर्तीचे ड्रग्स कनेक्शन तपासण्यात आले. एनसीबीची दोन पथके सकाळी 6.30 वाजता त्यांच्या घरी गेली होती.

एनसीबीने सॅमुअल मिरांडा आणि शोविकला ताब्यात घेतले आहे. दोघांची साडे आठ तासांपासून चौकशी सुरू आहे. दोघांना अटकदेखील केली जाऊ शकते. तसेच, लवकरच रियाला चौकशीसाठी बोलवले जाण्याची शक्यता आहे. एनसीबीने ड्रग्सप्रकरणी जैद विलात्रा,अब्दुल बासित परिहार सह आतापर्यंत 5 जणांना ताब्यात घेतले आहे. असे सांगितले जात आहे की, रिया, तिचा भाऊ शोविक आणि मिरांडासोबत संबंध असल्याचे मान्य केले आहे. गुरुवारी शोविक आणि त्याच्या भावासोबत ड्रग्स चॅटसमोर आली आहे.